जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

अवैध वाळू उपसा,ग्रामस्थ संतप्त,कोपरगावात आंदोलनाचा इशारा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात अद्याप वैध वाळू डेपो सुरु झाला नसताना ‘त्या’ नावावर मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु असून गोदावरी काठचा शेती व्यवसाय उध्वस्त होण्याची भीती व्यक्त करून या विरोधात सुरेगाव येथील सरपंच शशिकांत वाबळे आणि अन्य पदाधिकारी यांनी कोपरगाव नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते यांना भेटून सदर वाळू उपसा बंद करण्याचा इशारा दिला असून तो बंद केला नाही तर गोदावरी नदीकाठचे शेतकरी आणि ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

“आपण ग्रामसभेचा ठराव करून वाळू उपसा करण्यास विरोध केला होता त्यासाठी शिर्डी प्रांताधिकारी यांनीं दहा दिवसात दुसरी ग्रामसभा घेणे अनिवार्य होते.मात्र त्या पातळीवर शुकशुकाट आहे.असे असतांना सुरेगाव हद्दीत प्राथमिक मांडणी आणि वाळू उपसा करण्यासाठी आवश्यक बोटी आणि तत्सम यंत्रसामग्री गावात आल्या आहेत.नियम बनवायला शासन असताना त्याची पायमल्ली करण्यात शासनच अग्रभागी आहे हे विशेष !-शशिकांत वाबळे,सरपंच,सुरेगाव ग्रामपंचायत.

आता नवीन वाळू धोरणानुसार महसूल विभागाच्या माध्यमातून वाळूची विक्री केली जाणार असल्याची घोषणा राज्याच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ०१ मे २०२३ रोजी केली होती.त्यामुळे आता वाळू स्वस्तात मिळणे शक्य होणार असा नागरिकांचा विश्वास वाढला होता.यासंबंधी राज्याचे महसूल मंत्री यांनी वाळूच्या अवैध उत्खनन प्रतिबंधासाठी राज्य सरकार घरपोच वाळू देणार असल्याचे सांगितले होते.मात्र त्याबाबत ग्रामसभेची शिफारस अनिवार्य करण्यात आलेली होती.त्यासाठी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या वाळू डेपोंचे उद्घाटन होणार असल्याचा बातम्या प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाल्या होत्या.जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी गत सप्ताहात केले होते.तथापि कोपरगाव तालुक्यात ६०० रुपयात एक ब्रास वाळू नागरिकांना देण्यात आलेली नाही हे विशेष.आता तर पावसाळा सुरु होऊन जवळपास एक महिना उलटल्यानंतर हि स्थिती समोर आली आहे.त्याच बरोबर कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगांव येथे पुढील आठवड्यात वाळू साठवणूक तसेच विक्री डेपो सुरू करण्यात येणार असल्याचा बार फुसका ठरला आहे.त्यामुळे हा डेपो सुरु करताना ग्रामस्थांना विचारात घेतले होते का नाही ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

दरम्यान सरपंच शशिकांत वाबळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,”आपण ग्रामसभेचा ठराव करून वाळू उपसा करण्यास विरोध केला होता त्यासाठी शिर्डी प्रांताधिकारी यांनीं दहा दिवसात दुसरी ग्रामसभा घेणे अनिवार्य होते.मात्र त्या पातळीवर शुकशुकाट आहे.असे असतांना सुरेगाव हद्दीत प्राथमिक मांडणी आणि वाळू उपसा करण्यासाठी आवश्यक बोटी आणि तत्सम यंत्रसामग्री गावात आल्या आहेत.नियम बनवायला शासन असताना त्याची पायमल्ली करण्यात शासनच अग्रभागी असल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.त्यामुळे शासन आदेशाची पायमल्ली करून वारेमाप वाळू उपसा करून गोदावरी काठची शेती उध्वस्त करण्याचे काम राजरोस सुरु होत असल्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.महसुलच्या कोपरगाव तालुका प्रशासनाने वाळू उपसा करण्याचा शासन आदेश त्वरित रद्द करावा अन्यथा आपण महसूल मंत्र्यांच्या मुंबई येथील निवास स्थानकासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा शेवटी सरपंच शशिकांत वाबळे यांनी शेवटी दिला आहे.

सदर प्रसंगी बाबासाहेब वाबळे,विलास शामराव जाधव,राहुल निकम,दत्तू जमधडे,मोतीराम निकम,सुहास वाबळे,संदीप कोल्हे,संजय कोळपे,नितीन हळनोर,अजित शेळके,नवनाथ पांडुरंग शेळके,प्रकाश वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close