अभिष्टचिंतन कार्यक्रम
शिकवणी वर्गातून पालकांची लूट -…या मंत्र्यांचा दावा !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) म्हणजे विद्यार्थी आणि पालकांची लूट असून विद्यार्थ्यांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलून लाखो रुपये उकळले जात आहेत.दर्जेदार शिक्षण महाविद्यालयांनी दिले नाही तर कोचिंग क्लासेसची गरजच भासणार नाही असे प्रतिपादन राज्याचे जलसंपवा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

यावेळी राधाकृष्ण विखे यांनी,”एकेकाळी एस.एस.जी.एम कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत होत्या.प्रवेश मिळाला नाही तरच विद्यार्थी के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचा विचार करत.मात्र वर्तमानात परिस्थिती उलटी झाली आहे.आधी सोमय्या महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी गर्दी होते आणि येथे प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थी एस.एस.जी.एम.कॉलेजकडे वळतात असा दावा केला आहे.
कोपरगाव येथील तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त गोदावरीकाठी असलेल्या के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांची ग्रंथतुला पार पडली त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

दरम्यान यावेळी उपस्थितांनी संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांच्या शैक्षणिक कार्याचा गेल्या तीन दशकांचा चढता आलेख सादर करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांचा स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कार केला आहे व त्यांच्या उर्वरित आयुष्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर प्रसंगी कोपरगावचे आ.आशुतोष काळे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,संगमनेर नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा दुर्गाताई तांबे,गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संस्थेचे सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,रावसाहेब रोहमारे,संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे,राहुल रोहमारे,सुजित रोहमारे,प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच रोहमारे परिवारासह विविध मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केली त्यावेळी गुणवत्तेवर ध्यान दिले होते.मात्र वर्तमानात शिक्षण संस्थांची घसरती गुणवत्ता अधोरेखित करत विखे म्हणाले,एकेकाळी एस.एस.जी.एम कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत होत्या.प्रवेश मिळाला नाही तरच विद्यार्थी के.जे. सोमैय्या महाविद्यालयाचा विचार करत.मात्र वर्तमानात परिस्थिती उलटी झाली आहे.आधी सोमय्या महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी गर्दी होते आणि येथे प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थी एस.एस.जी.एम.कॉलेजकडे वळतात असा दावा केला आहे.हे चित्र शिक्षण संस्थांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोचिंग क्लासेसच्या वाढत्या व्यवसायावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.उद्योगाभिमुख शिक्षण दिले नाही तर भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,राजेश परजणे,ओमप्रकाश कोयटे,ॲड.संजीव कुलकर्णी,श्रेया रोहमारे व स्वरा रोहमारे तसेच अशोक रोहमारे आदींनी अशोक रोहमारे यांचे प्रति आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर उपस्थितांचे आभार कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदीप रोहमारे यांनी मानले आहे.



