अभिष्टचिंतन कार्यक्रम
…नेत्यांचा वाढदिवस कोपरगाव येथे होणार संपन्न !
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,देशाचे नेते खा.शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त दि.१२ डिसेंबर रोजी कोपरगाव शहर आणि तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती प्रसिध्दी कार्यालयातून दिली आहे.
भारतातील सर्वाधिक संसदीय कारकिर्द असलेले नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक खासदार शरद पवार यांचा उद्या ८४ वा वाढदिवस आहे.मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.पन्नासहून अधिक वर्ष शरद पवार राजकारणात सक्रिय आहेत.अनेक केंद्रीय आणि राज्यात मंत्रिपदावर त्यांनी काम केले,राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले हे सर्वविदित आहे.त्यांचा देशभरात विशेष दबदबा आहे.त्यांचा उद्या वाढदिवस संपन्न होत आहे.त्यानिमित्त कोपरगाव राष्ट्रवादीच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न होत आहे.त्याबद्दल त्यांच्या कार्यालयाने आमच्या प्रतिनिधीस माहिती दिली आहे.
दरम्यान या निमित्त सकाळी ११ वा स्व.माधवराव आढाव विद्यालय (जुने सायन्स कॉलेज)खाऊ व वही वाटप,सकाळी ११.४५ वाजता कोपरगाव नगरपरिषद शाळा क्र.९ खडकी खाऊ व वही वाटप,दुपारी १२.३० वाजता लायन्स मुक बधिर विद्यालय खाऊ व वही वाटप,सायंकाळी ०७ वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे विद्यार्थ्यांना स्नेहभोजन,सायंकाळी ७.३० वाजता शहरातील साई बाबा कॉर्नर व बस स्थानक येथे गरजूंना ब्लँकेट वाटप संपन्न होणार आहे तर दुसऱ्या दिवशी दिनाक १३ डिसेंबर रोजी सकाळी
१० वाजता जि.प.शाळा मनाई वस्ती येथे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप केले जाणार आहे.तर सकाळी ११.३० वाजता ग्रामीण रुग्णालया कोपरगाव येथे रुग्णांना फळ संपन्न होणार आहे.याचा लाभ गरजू नागरिकांनी घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संदीप वर्पे यांनी शेवटी केले आहे.