अपारंपरिक ऊर्जा विभाग
श्री साईसंस्थानच्या रूफ टॉप सोलर पी.व्ही.सिस्टींमसाठी निधी मंजूर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या विविध इमारतींवर रूफ टॉप सोलर पी.व्ही.सिस्टींम प्रकल्पासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिीसिटी ट्रान्समिशन कंपनी,मुंबई यांचेकडून सी एस आर फंडातून रक्कम रूपये ४ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती संस्थानचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सीवा शंकर यांनी दिली आहे.
या प्रकल्पासाठी संस्थानकडून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी ट्रान्समिशन कंपनी यांचेकडे प्रस्ताव सादर करणेत आला होता.शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व प्रदीप पेशकार यांचे याकामी सहकार्य लाभले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या प्रकल्पाकरीता संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, सदस्य-तथा-जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ आणि तत्कालीन प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव यांनी शासन स्तरावर प्रयत्न केले असल्याची माहिती दिली आहे.
सदर प्रकल्प संस्थानमध्ये कार्यान्वीत करण्यासाठी तसेच पुढील कृती आराखड्याबाबत ३ मे रोजी नाशिक येथे महास्ट्रान्सकोचे मुख्य अभियंता संजीव जी.भोले,यांच्या दालनात चर्चा झाली.त्यावेळी संस्थानचे प्र.उप कार्यकारी अभियंता (विद्युत) किशोर गवळी आणि प्र.मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ हे संस्थान प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये सकारात्मक आणि महत्वपूर्ण चर्चा होवून मुख्य अभियंता संजीव भोले,नाशिक यांनी संस्थानचे विविध इमारतींवर रूफ-टॉप सोलरबाबत कार्यवाही करण्यासाठी तसेच तांत्रीक बाबींचा प्राथमिक सर्व्हे करणेबाबत पुढील आठ दिवसांत शिर्डी येथे जाणेकामी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना वजा निर्देश दिलेले आहेत.