अपघात
महावितरण कंपनीचे खांब धोकादायक स्थितीत,अपघात होण्याची शक्यता !
न्यूजसेवा
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी शिवारात चारी नंबर पाच या परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीने उभे केलेले अनेक खांब धोकादायक झाले असून ते कधीही पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे वीज यंत्रणेत मोठा खेळ खंडोबा होण्याची शक्यता असल्याची भीती शेतकरी वर्गांमधून व्यक्त होत आहे.
“कोपरगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळाने महावितरण कंपनीचे खांब तिरपे व धोकादायक होऊन ते कधी पडतील याची खात्री राहिली नसल्यामुळे जीवित व आर्थिक हानी होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.ग्रामीण भागात अशा वाकलेल्या विद्युत पोलमुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर भीतीची वातावरण निर्माण झाले आहे.याची महावितरण कंपनीने गंभीर दखल घेणे गरजेचे झाले आहे”-एक शेतकरी कुंभारी,ता.कोपरगाव.
महाराष्ट्र शासनाने गाव तेथे वीजपुरवठा पुरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेले अनेक वर्ष मोठे प्रयत्न केले मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी खांब उभे करताना काम निकृष्ठ पद्धतीने केले आहे.त्यासाठी अधिकाऱ्यांनी देखरेख केली असल्याचे दिसत नाही.परिणामी हे खांब लहान मोठ्या वादळात देखील मोठ्या प्रमाणावर तिरपे व धोकादायक होऊन ते कधी पडतील याची खात्री राहिली नसल्यामुळे जीवित व आर्थिक हानी होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात अशा वाकलेल्या विद्युत पोलमुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर भीतीची वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी महावितरण कोपरगाव कार्यालय तात्काळ कोपरगाव तालुक्यातील वाकलेल्या खांबाची पाहणी करून ते दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली असून या गंभीर प्रश्नात आ.आशुतोष काळे यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी कुंभारीसह तालुक्यातून पुढे आली आहे.