अपघात
तरुण वाहून गेल्याची भीती,कोपरगाव तालुक्यातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला तरुण सुनील लहानु माळी (वय-२६) हा आपल्या मित्रसमवेत पोहण्यासाठी गोदावरी कालव्यांवर गेला असता तो सदर कालव्यात वाहून गेला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.त्याचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
गोदावरी कालव्यांना नुकतेच उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.त्यातील डावा कालवा नुकताच ब्राम्हणगाव शिवारात फुटला आहे.तर उजवा कालवा मात्र पूर्ण क्षमतेने सुरु आहे.त्यात पोहण्यास शहाजापूर येथील तरुण आज दुपारी ०२ वाजेच्या सुमारास गेले होते.मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो सदर कालव्यात बेपत्ता झाला आहे.उशीराने त्याचे शव कोळगाव माळ शिवारात सापडले असल्याची माहिती प्राप्त झाली होती मात्र नंतर ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गोदावरी कालव्यांना नुकतेच उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.त्यातील डावा कालवा नुकताच ब्राम्हणगाव शिवारात फुटला आहे.तर उजवा कालवा मात्र पूर्ण क्षमतेने सुरु आहे.त्यात पोहण्यास शहाजापूर येथील तरुण आज दुपारी ०२ वाजेच्या सुमारास गेले होते.मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो सदर कालव्यात बेपत्ता झाला आहे.त्यास शोध घेण्याचे काम तेथील रहिवासी रमेश भोंगळ व त्यांचा मुलगा शिवा भोंगळ व पुतण्या गणेश भोंगळ आदींनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
दरम्यान उशिराने आलेल्या माहिती नुसार सहा वाजेच्या सुमारास कोळगाव माळ ता.सिन्नर जिल्हा नाशिक शिवारात सापडला असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही.त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी,एक मुलगी असा परिवार आहे.मयत तरुण हा कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्यात रोजंदारीवर कार्यरत होता अशी माहिती प्राप्त झाली आहे.मात्र त्यास कोपरगाव तालुका पोलिसांनी दुजोरा दिला नाही शोध मोहीम अद्याप सुरु आहे.मात्र आता अंधार झाल्याने ती थांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्यात बेपत्ता झालेला तरुण सुनील माळी हाही होता.यावर अनेकांचे एकमत आहे.त्यासाठी मोठी शोध मोहीम राबवली मात्र त्याला शोधण्यास अपयश आले आहे.त्यामुळे सदर तरुण कोणास आढळल्यास कोपरगाव तालुका पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.