अपघात
कोपरगाव शहरात दुचाकी-जीप अपघात,एक जखमी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नगरपरिषद वाचनालयासमोर असलेल्या चौकात आज दुपारी दोनच्या सुमारास हिरो होंडा दुचाकीस एका महिंद्रा स्कॉर्पिओने दिलेल्या जोरदार धडकेत कोकमठाण येथील वाल्मिक दैने (वय-३५) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
आज दुपारी कोकमठाण येथील दुचाकी स्वार वाल्मिक दैने हा तरुण उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना समोरून येणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ (क्रं. या जीपने जोरदार धडक दिली आहे.यात सदर तरुणांचे उजवा पाय घोट्याचे वर मोडला आहे.या प्रकरणी घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर सदर जीप चालकाने त्यास आपल्या जीपमध्ये घालून उपचारार्थ खाजगी रुग्नालयात भरती केले आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही अशी माहिती दिली आहे.