जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

अंकाई किल्ल्याची सहल बेतली जीवावर,कोपरगावातील दोन तरुण ठार

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरातील सुमारे सतरा तरुण सुट्टीचा आंनद घेण्यासाठी आज सकाळी येवला तालुक्यातील प्राचीन अंकाई किल्ल्यावर गेले असता त्या ठिकाणी असलेल्या तळ्यावर पोहण्याचा मोह त्यांना महाग पडला असून त्यात मिलिंद रविंद्र जाधव (वय-२०) हा पोहण्यास गेला असता त्यास वाचविण्याच्या प्रयत्नांत रोहित पिंटू राठोड (वय-२४) हा मृत्यूमुखी पडला असून यात दोघेही गतप्राण झाले असल्याची धक्कादायक माहिती आमच्या प्रतिनिधीने येवला येथून दिली आहे.याबाबत सर्व प्रथम कोपरगावच्या प्रतिनिधीस हि माहिती मिळाली होती.या घटनेने कोपरगाव शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोपरगाव शहरातील सतरा तरुणांच्या जथ्याने या सुट्टीचा आनंद घेण्याचा निर्णय घेतला होता.व त्या नुसार त्यांनी आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंकाई या प्राचीन किल्ल्याकडे कूच केले होते.दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक तरुण मिलिंद जाधव हा तेथील तळ्यात पाहण्यास गेला होता.मात्र त्यास पोहता येत नव्हते.त्यामुळे तो बुडाला असता त्याचा अन्य मित्र रोहित राठोड हा त्यास वाचविण्यास गेला असता तोही त्या प्रयत्नात बुडाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला आहे.पंधरा ऑगस्ट यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.देशभरात स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे.कोपरगाव शहरासह तालुक्यात देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.त्या निमित्त सर्वत्र सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या.त्यामुळे या सुट्ट्यांचा फायदा उचलण्यास अनेकांनी संधी साधली होती त्याला कोपरगाव येथील तरूणही अपवाद नव्हते.

कोपरगाव शहरातील सतरा तरुणांच्या जथ्याने या सुट्टीचा आनंद घेण्याचा निर्णय घेतला होता.व त्या नुसार त्यांनी आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंकाई या प्राचीन किल्ल्याकडे कूच केले होते.दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक तरुण मिलिंद जाधव हा तेथील तळ्यात पाहण्यास गेला होता.मात्र त्यास पोहता येत नव्हते.त्यामुळे तो बुडाला असता त्याचा अन्य मित्र रोहित राठोड हा त्यास वाचविण्यास गेला असता तोही त्या प्रयत्नात बुडाला आहे.

या प्रकरणी एका तरुणाने लगेच आमच्या प्रतिनिधीस संपर्क साधला असता त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला होता.मात्र येवला येथील पोलीस ठाण्यास संपर्क झाला नसल्याचे समजते.मात्र तेथील अंकाई येथील ग्रामस्थांच्या ग्रामरक्षक दलाने तेथील तळ्यात धाव घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर उशीर झाला होता.

दरम्यान या प्रकरणी येवला पोलिसांनी या प्रकरणी सदर तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी येवला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात केली आहे.तेथील उत्तरीय तपासणी नंतर ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती आमच्या येवला येथीळ प्रतिनिधीने दिली आहे.

पुढील तपास येवला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील पोलीस करत आहेत.दरम्यान या घटनेने कोपरंगाव शहरात खळबळ उडाली आहे.मात्र ते तरुण नेमके कोणत्या उपनगरातील ठिकाणचे आहे याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close