अपघात
दुचाकीस्वारांना पुन्हा हेल्मेट वापरण्याची सक्ती ?
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राज्यात व देशात प्राणांतिक अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून यात राज्य व राष्ट्रीय महामार्गावर अपघात होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने नाशिक पोलीस महानिरीक्षक यांनी यांनी नाशिक विभागातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश पारित केले आहे.व बेशिस्त वाहन चालकांवर जास्तीत जास्त खटले दाखल करण्याचे आदेश दिले असल्याने बेशिस्त वाहन चालकांत खळबळ उडाली आहे.
संग्रहित छायाचित्र
तीन वर्षांपूर्वी विविध शहरात १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली होती.जोपर्यंत शंभर टक्के वाहनचालक हेल्मेट वापरणार नाहीत,तोपर्यंत दंडात्मक कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला होता.परंतु केवळ दंडात्मक कारवाई करून हेल्मेट सक्तीची मोहीम यशस्वी झाली नाही.हेल्मेट सक्ती करण्यात आल्याने नागरिकांनी नाकं मुरडण्यास सुरुवात केली होती.यावर्षी नागरिक नेमकी कोणती भूमिका घेणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तीन वर्षांपूर्वी विविध शहरात १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली होती.जोपर्यंत शंभर टक्के वाहनचालक हेल्मेट वापरणार नाहीत,तोपर्यंत दंडात्मक कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला होता.परंतु केवळ दंडात्मक कारवाई करून हेल्मेट सक्तीची मोहीम यशस्वी झाली नाही.हेल्मेट सक्ती करण्यात आल्याने नागरिकांनी नाकं मुरडण्यास सुरुवात केली होती.अनेकांनी पोलिसांना चकवा देत पर्यायी मार्ग शोधले.पुणे शहराप्रमाणेच नगरमधील काही संघटनांनी देखील या सक्तीला विरोध दर्शवला.पोलिस व जिल्हा प्रशासनाने मात्र हा विरोध झुगारून हेल्मेट सक्ती करत दंडात्मक कारवाई केली होती.लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला नंतर मात्र हा प्रयत्न सोडून देण्यात आला होता.आता यावर्षी पुन्हा एकदा नाशिक येथील पोलीस उपमहानिरीक्षक यांनी या वर्षी पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय (क्रं.११६/वाचक/अपघात/८४८/२०२२ नाशिक दि.२२ मार्च २०२२) घेतला आहे.हे पत्र सर्व नगर जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.त्यात प्राणांतिक मृत्यू दर कमी करण्याचे कारण दिले असले तरी सरकारी तिजोरीतील चणचण हेच प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.
हि मोहीम नुकतीच २५ मार्च पासून सुरु करण्यात आली असली तरी ती आगामी १० एप्रिल पर्यंत राबविण्यात येणार आहे.या मोहिमेद्वारे नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.सदर नियमाचे उल्लघंन करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.