अपघात
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचे अपघातात निधन
जनशक्ती न्यूजसेवा
गोवा-(प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे प्रवास करीत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासोबत पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे.
माजी केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक शिर्डीचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे चांगले मित्र होते.ते शिर्डीच्या साईबाबांचे निस्सीम भक्त होते व शिर्डीत ते अनेक वेळा आलेले आहेत.
कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करता श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी पलटल्याचे सांगितले जात आहे. ते यल्लपुराहून गोकर्ण येथे प्रवास करीत होते.
श्रीपाद नाईक हे गोव्यातील मोठं प्रस्थ आहे. गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या निकटवर्तींयापैकी एक आहेत. गोव्यातील भाजपचा चेहरा म्हणूनही त्यांचा ओळखलं जातं. श्रीपाद नाईक यांचे स्वीय सचिव दीपक यांचाही अपघातात मृत्यू झाल्याच कळतय. अंकोलाहून यल्लापूर मार्गे गोकर्णला जात होते. होनकुंबी गावाजवळ त्यांची गाडी पलटी झाली.
नाईक हे माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री राहिले आहेत.अपघातानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ येथे हा अपघात झाला. नाईक आपल्या पत्नीसमवेत कुठेतरी जात होते,त्याचदरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर त्यांची पत्नी बराच काळ बेशुद्ध राहिली, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर गोव्यात उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केलाय. श्रीपाद नाईक आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी आणि संरक्षण राज्यमंत्री आहेत.
माजी केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक शिर्डीचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे चांगले मित्र होते.ते शिर्डीच्या साईबाबांचे निस्सीम भक्त होते व शिर्डीत ते अनेक वेळा आलेले आहेत.