अपघात
समृद्धी महामार्गावर अपघात मालिका सुरूच,दोघांचा मृत्यू

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गावर आज शुक्रवारी एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली असून त्यात शिर्डी येथील प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके (वय -45) यांचा यांचा अपघाती मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा सुचित शेळके (वय-14) हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.जखमीस कोपरगाव नजीक असलेल्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अपघात इतका तीव्र होता की टोयोटा हायब्रीड कारचा (एम.एच.17 बी.झेड.4343 ) पूर्ण चक्काचूर झाला असल्याची माहिती आहे.

जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके आणि मुलगा सुचित शेळके यांना घेऊन माहूर येथील देवींचे दर्शन घेऊन आपल्या घरी शिर्डी येथे आज दुपारी येत असताना त्यांचे एका अनामिक क्षणी दुर्लक्ष होऊन ते समोर उभ्या असलेल्या कंटेनर जाऊन मागील बाजूने धडकले होते.त्यात त्यांच्या टोयोटा फॉर्च्युनर कारचा जवळपास चक्काचूर झाला आहे.या घटनेत जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके हे जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.तर त्यांचा एक मुलगा सुचित शेळके हा गंभीर जखमी झाला आहे.स्व. जितेंद्र शेळके हे शिर्डीतील सिल्व्हर ओक शिक्षण संस्थेचे संस्थापक होते अशी माहिती हाती आली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,जितेंद्र शेळके हे शिर्डी येथील रहिवासी होते त्यांचे शिर्डीत प्रतिष्ठित कुटुंबात गणना होत होती.ते आपली पत्नी अनुराधा शेळके आणि मुलगा सुचित शेळके यांना घेऊन माहूर येथील देवींचे दर्शन घेऊन आपल्या घरी शिर्डी येथे आज दुपारी येत असताना त्यांचे एका अनामिक क्षणी दुर्लक्ष होऊन ते समोर उभ्या असलेल्या कंटेनर जाऊन मागील बाजूने धडकले होते.त्यात त्यांच्या टोयोटा फॉर्च्युनर कारचा जवळपास चक्काचूर झाला आहे.या घटनेत जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके हे जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.तर त्यांचा एक मुलगा सुचित शेळके हा गंभीर जखमी झाला आहे.त्यास कोपरगाव जवळील संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.तर शेळके पती पत्नीस कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता त्यांना तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे.मृत जितेंद्र शेळके यांचे पश्चात आई,दोन भाऊ,एक बहीण असा परिवार आहे.

दरम्यान या अपघातात मृत्यू झालेले जितेंद्र शेळके यांचा महाठग आणि महिलांच्या लैंगिक चालत सहभागी असलेला अशोक खरात यांचेशी संबंध असल्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली असून ते ईशानेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष असल्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच नजीकच्या ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली होती.मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.मात्र ग्रामस्थानी तातडीने रुग्णवाहिकारला पाचारण करून त्यांना पुढील उपचारांसाठी रवानगी केली आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुंदरडे यांनी घाव घेऊन पुढील कारवाई सूर केली आहे.



