जाहिरात-9423439946
अपघात

झगडे फाटा रस्त्याचा आणखी एक बळी,नागरिकांचा,”रास्ता रोको” 

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   उत्तर भारतीयांना दक्षिण भारताशी जोडण्यात अहंभूमिका निभावणाऱ्या झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याचे दुर्दशेचे नवनवे अवतार समोर येत असून त्यात आणखी एका विद्यार्थ्यांचा बळी गेला असून एक सुदैवाने बचावला आहे.मात्र संतप्त ग्रामस्थानी या घटनेविरोधात,”रास्ता रोको” करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.उशिराने अहिल्यानगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी उद्या घटनास्थळाला भेट देण्याचे आणि रस्त्याची दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने अखेर ते आंदोलन संपविण्यात आले आहे.

मयत विद्यार्थी गुरुत्व कैलास गाढे याचे छायाचित्र.

आगामी वर्षी नाशिक येथे दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभ मेळा संपन्न होत आहे.त्यासाठी नाशिक आणि नजीकची देवस्थाने आणि तीर्थस्थाने सहा आणि चार पदरी होणार आहे.त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तीस हजार कोटींची मोठी आर्थिक तरतूद केली आहे.मात्र शिर्डीला जोडणारा रस्ता हा नांदुर शिंगोटे-तळेगाव दिघे मार्गे गोगलगाव लोणी निर्मळ पिंपरी मार्गे केला जातो हे मोठे आठवे आश्चर्य मानले जात आहे.मात्र सर्वात जवळचा पालखी मार्ग असलेली वावी वरून सायाळे-जवळके हा दुष्काळी भागातून जाणारा मार्ग जाणीवपूर्वक केला जात नाही.

  कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्त्यांची वाट लागली आहे.त्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचं आहे.मात्र म्हणावा असा निधी मिळत नाही व तालुक्यातील रस्ते मात्र सुरळीत होत नाही हि तालुक्याची शोकांतिका बनली आहे.नजीकच्या तालुक्यातील रस्ते मात्र चकाकताना दिसत आहे.त्यात मराठवाड्यातील तुलनेने मागास असलेल्या वैजापूर तालुका आणि येवला तालुका वरचढ ठरताना दिसत आहे.शेजारी संगमनेर,सिन्नर,निफाड तालुक्यातील कोणतेही रस्ते नादुरुस्त असल्याचे दिसत नाही.मात्र राजकारणात भलत्याच पुढारलेल्या अ.नगर जिल्ह्यातील प्रवेश केला की वाहतूकदारांना नगर जिल्ह्यात आल्याची चाहूल लागते ती मोठमोठ्या खड्डयांनी.त्यामुळे स्वाभाविक पणे त्यांच्या तोंडी नेते आणि प्रशासन यांना देण्यासाठी शेलकी विशेषणे चर्चेचे कारण ठरत आहे.कोपरगाव तालुक्यातील जुना नागपूर-मुंबई मार्गाला जोडून पुढे संगमनेरकडे जाणाऱ्या तळेगाव दिघे मार्ग हा गेली अनेक वर्षे नेते आणि प्रशासन अधिकाऱ्यांना शिव्या शाप देण्याचे साधन ठरला असल्याचे वारंवार दिसून येत आहे.मात्र प्रशासन हलण्यास तयार नाही.

संतप्त नागरिकांचा,”रास्ता रोको” दिसत आहे.

   शिर्डीची अवजड वाहतूक गेली अनेक दशके याच मार्गावरून शिर्डीच्या गर्दीच्या काळात सुरू ठेवली होती.शिर्डी बाह्यवळण रस्ता होण्याच्या आधी आणि आजही गर्दी आणि महोत्सव काळात त्याचा वापर होत आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक आदेश देण्यात आघाडीवर असतात मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत कोणालाही कणव असल्याचे दिसून येत नाही.पुढारी इतके निर्दयी झाले आहे की विचारू नका.आगामी वर्षी नाशिक येथे दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभ मेळा संपन्न होत आहे.त्यासाठी नाशिक आणि नजीकची देवस्थाने आणि तीर्थस्थाने सहा आणि चार पदरी होणार आहे.त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तीस हजार कोटींची मोठी आर्थिक तरतूद केली आहे.मात्र शिर्डीला जोडणारा रस्ता हा नांदुर शिंगोटे-तळेगाव दिघे मार्गे गोगलगाव लोणी निर्मळ पिंपरी मार्गे केला जातो हे मोठे आठवे आश्चर्य मानले जात आहे.मात्र सर्वात जवळचा पालखी मार्ग असलेली वावी वरून सायाळे-जवळके हा दुष्काळी भागातून जाणारा मार्ग जाणीवपूर्वक केला जात नाही.शिवाय ज्या मार्गावर आज सकाळी अपघात झाला त्याची दुरावस्था ही शिर्डीची गर्दीच्या काळात होणारी अवजड वाहतूक याच मार्गाने झाल्याने झाली आहे.त्यातून अनेक बळी गेले आहे.आजची घटना याच दुर्लक्षाने झाली आहे हे येथे विसरता येणार नाही.

ज्या अवजड कंटेनरने या विद्यार्थ्याला उडवले तो कंटेनर आणि संतप्त ग्रामस्थ दिसत आहे.

घटनास्थळी शिर्डीचे विभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती,शिर्डी पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे,नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते आदींनी धाव घेऊनही ग्रामस्थानी ऐकले नाही शेवट त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता चौधरी हे घटनास्थळी आले.त्यांनाही आंदोनकर्त्यानी जुमानले नाही.शेवटी चौधरी यांनी नगर येथील अधीक्षक अभियंता यांचेशी दूरध्वनी वरून संपर्क साधून आप बीती सांगितली त्यानंतर लेखी दिल्यानंतर आंदोलन संपवले आहे.

   कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर शिवारातील म्हसोबा वस्ती येथील रहिवासी असलेले मात्र माध्यमिक शाळेत जवळके येथे सायकलवरून जाणारे विद्यार्थी सकाळी 8.30 वाजता जात असताना अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांना धक्का दिला आहे.त्यात गुरुत्व कैलास गाढे (वय-12 वर्षे हा विद्यार्थी आधी गंभीर जखमी झाला होता.तर एक जण ट्रकच्या उलट बाजूला पडल्याने बालंबाल बचावाला आहे.जखमी विद्यार्थाला शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले आहे.या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी “रास्ता रोको”  करत प्रशासनाला नादुरुस्त रस्त्याबाबत कठोर जाब विचारला आहे.

मयत विद्यार्थ्याची सायकल छायाचित्रात दिसत आहे.

 

झगडेफाटा वडगाव पान मार्गावरील निकृष्ट व रस्त्याने अखेर एका निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवी बळी गेला असून दहा कोटी रुपयांच्या कथित निधीचा चुराडा करत संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केला असल्याचा आरोप कोल्हे गटाच्या तुकाराम गव्हाणे यांनी केला आहे.

  दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांनी निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते यांना तातडीने घटनास्थळी पाठवून दिले आहे.मात्र संतप्त ग्रामस्थानी,”किसी की एक ना सुनी “त्या ठिकाणी शिर्डीचे विभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती,शिर्डी पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे आदींनी धाव घेऊनही ग्रामस्थानी ऐकले नाही शेवट त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता चौधरी यांनी धाव घेतली होती.त्यांनाही आंदोनकर्त्यानी जुमानले नाही.शेवटी चौधरी यांनी नगर येथील अधीक्षक अभियंता यांचेशी दूरध्वनी वरून संपर्क साधून आप बीती सांगितली.त्यांनी उद्या सकाळी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यानंतर चौधरी यांचे भ्रमणध्वनीवरून संबंधित माळवदे या ठेकेदाराची संपर्क साधून उद्या काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.त्यानंतर ग्रामस्थानी आपले आंदोलन संपवले आहे.दरम्यान मयत विद्यार्थी गुरुत्व गाढे याचे पश्चात आई,वडील,आजी आजोबा,एक भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close