अपघात
संक्रांतीच्या दिवशी दुर्दैवी घटना,अकस्मात मृत्यूची नोंद !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात काल पुलाजवळ लक्ष्मीनगर येथील एका इसमाचे शव आढळले असताना आज दुसरी दुर्दैवी घटना उघडकीस आली असून लक्ष्मीनगर या उपनगरात पतंग उडविताना विजेचा तीव्र धक्का लागून एक १४ वर्षीय मुलगा मयत झाला तर अन्य एक १८ वर्षीय मुलगा जखमी झाला असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

कोपरगाव शहरात आज संक्रांतीचा उत्सव सुरू असताना मात्र कोपरगाव शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे.यात पतंग उडविण्यासाठी आपल्या मामाच्या गावी पिंपरी चिंचवड(पुणे) हून आलेला अल्पवयीन मुलगा अर्णव महेश व्यवहारे हा व त्यांचा अन्य एक मित्र ऋषिकेश संजय वाघमारे (वय-१९) रा.कोपरगाव हे लहान तारेच्या सहाय्याने पतंग उडवत असताना शेजारी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला त्याचा स्पर्श होऊन त्यात अर्णव व्यवहारे हा मयत झाला आहे तर ऋषिकेश संजय वाघमारे हा गंभीर जखमी झाला आहे.
मकर संक्रांत हा सूर्यदेवतेचा सण असून,सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो,तेव्हा हा उत्सव साजरा होतो,जो दरवर्षी १४ जानेवारीच्या सुमारास येतो आणि या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.हा सण शेती आणि ऋतू बदलाचा प्रतीक असून, ‘तिळगुळ घ्या,गोड गोड बोला’ या उक्तीतून नात्यांमध्ये गोडवा आणणे,तिळाचे दान करणे आणि काळे कपडे परिधान करणे यांसारख्या परंपरा या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे,तसेच या दिवशी संक्रांती देवीने संक्रासुर राक्षसाचा वध केल्याची पौराणिक कथा सांगितली जाते.त्याच बरोबर या दिवशी तरुण पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात नव्हे हा उत्सव आता पर्वणी ठरला आहे.आज हा उत्सव सुरू असताना मात्र कोपरगाव शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे.यात पतंग उडविण्यासाठी आपल्या मामाच्या गावी पिंपरी चिंचवड(पुणे) हून आलेला अल्पवयीन मुलगा अर्णव महेश व्यवहारे हा व त्यांचा अन्य एक मित्र ऋषिकेश संजय वाघमारे (वय-१९) रा.कोपरगाव हे लहान तारेच्या सहाय्याने पतंग उडवत असताना शेजारी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला त्याचा स्पर्श होऊन त्यात अर्णव व्यवहारे हा मयत झाला आहे तर ऋषिकेश संजय वाघमारे हा गंभीर जखमी झाला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या घटनेला कोपरगाव शहर पोलिसांनी दुजोरा दिला आहे.या दुर्दैवी घटनेने कोपरगाव शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे आदींनी भेट दिली आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची ०४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल डी.एल.रोकडे हे करीत आहेत.



