जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

तरुण पाण्यात पडल्याची भीती,शोध जारी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरात गोदावरी नदीत धोत्रे येथील रहिवासी तरुण गोदाजल आणण्यासाठी आला असता तो रात्री बाराच्या सुमारास बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.त्या दुर्दैवी तरुणाचे नाव जयेश गणेश पेंढारे (वय -21) असल्याचे माहिती हाती आली आहे.या घटनेने धोत्रे आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

बेपत्ता तरुण जयेश पेंढारे.

  

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुण अनेक तरुणासोबत आला होता.त्याने आपला जलकुंभ भरून घेऊन जात असताना त्याचा तुंभासाठी वरून लावण्याचा कागद पाण्यात पडल्याने तो घेण्यासाठी गेला असता त्याचा अचानक पाण्यात तोल गेला.त्यावेळी बुडताना पाण्यातून हात वर करत मोबाईल चमकवला होता.त्यावेळी अन्य तरुणांनी त्याला मदत करण्याऐवजी त्या ठिकाणाहून पळ काढला असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.

  कोपरगाव तालुक्यातील पूर्वेकडील धोत्रे या ग्रामपंचायत हद्दीत दरवर्षी वीरभद्र देवस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.दरम्यान या उत्सवासाठी अनेक जण आपल्या गावी परतून दर्शनाचा लाभ घेत असतात.काही तरुण व भाविक दर वर्षी या दैवताला जलाभिषेक करण्यासाठी गोदावरी या पवित्र नदीवरील पवित्र जल आणण्यासाठी येत असतात.अन्य तरुणांसोबत हा तरुण काल दिनांक 4 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कावडीने पाणी आणण्यासाठी नदीकाठावर गेला होता.मात्र त्याचा एका अनामिक क्षणी तोल जाऊन तो पाण्यात पडला होता.त्यानंतर त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही.त्यामुळे त्याची सर्वत्र कोपरगाव तालुका पोलीस आणि अपद्ग्रस्त पाठक शोध घेत आहे.मात्र रात्री उशिरापर्यंत तो मिळून आला नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

खोध सुरू असताना पथक.

 

  दरम्यान गायब तरुण जयेश पेंढारे हा कुटुंबाला एकुलता एक होता.त्याच्या पश्चात आई,वडील,दोन बहिणी असा परिवार आहे.त्याचा पोलिस आणि आपत्कालीन पथक शोध घेत असून रात्री हा शोध थांबवला आहे.

  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस तसेच कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले होते.आज सकाळी एन.डी. आर.एफ.चे पथक घटनास्थळी दाखल झाले होते ते या तरुणाचा सर्वत्र शोध घेत आहे.त्याचा शोध घेण्यासाठी नदी परिसरात सखोल शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.गेल्या तीन तासांपासून ही मोहीम सुरू असून,अद्याप जयेशचा ठावठिकाणा लागलेला नाही.एन.डी.आर.एफ.पथक,नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिस यांचे पथक मिळून शोधकार्य सुरू ठेवले आहे.

  या घटनेमुळे वारी परिसरात हळहळ व्यक्त होत असून,नागरिकांनी जयेश पेंढारे याचा लवकर शोध घ्यावा अशी मागणी तालुका प्रशासनाकडे केली आहे.दरम्यान प्रशासनाच्या वतीने नागरिकांना नदीकाठावर गर्दी न करण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close