अपघात
अज्ञात वाहनाची धडक,एक ठार,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारात काल दुपारी अडीच वाजता जेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने शिर्डीकडे साईबाबा समाधीच्या दर्शनाला जात असलेल्या साईभक्तास जोराची धडक दिल्याने त्याचा या दुर्घटनेत मूळ गुजरात मधील मात्र वर्तमानात ठाणे येथील रहिवासी असलेले इसम किशोर किसनराव सुपेकर (वय-61) मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

किशोर सुपेकर नावाचे एक साईभक्त साईबाबांचे दर्शन होईल या आशेने जात असताना घारी शिवारात जगन्नाथ मंदिराचे पश्चिमेस शंभर फूट अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली होती.त्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते.त्यात त्यांचे निधन झाले आहे.
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांचा बोऱ्या वाजला आहे.मात्र शिर्डीला नाशिकवरून जोडणारा नाशिक शिर्डी हा रस्ता मात्र चारपदरी झाल्याने या रस्त्याने शिर्डीला येणारी वहाने भरधाव वेगाने जात असतात.त्यात अनेक नागरिकांचा व प्रवाशांचा मृत्यू होत असतो.अशीच घटना काल दि.02 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्यां सुमारास घडली आहे.शिर्डीला ठाणे येथील काही साईभक्त दिंडी घेऊन येत असतात.वर्षीही ते साईबाबांचे दर्शन होईल या आशेने जात असताना घारी शिवारात जगन्नाथ मंदिराचे पश्चिमेस शंभर फूट अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली होती.त्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते.त्यांना त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी तातडीने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.मयत इसम हा बी.12 शिवनेरी चाळ,मिनक्षिनगर,माशाचा पाडा रोड,काशीगाव मिरा रोड,ईस्ट ठाणे,मूळ रा.काकासाहेब टेकरे,खारीवाव रोड,दांडिया बाजार,वडोदरा,तालुका,जिल्हा,वडोदरा,गुजरात येथील रहिवासी असल्याचे समजते.अपघातानंतर अज्ञात वाहन चालक हा जखमी इसमावर उपचार न करता निघून गेला आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान या प्रकरणी फिर्यादी नरेश रमेश माने,(वय-48)खाजगी नोकरी,बी.-96 साई धाम सोसायटी समोर वैखुंट-2 न्यू.व्हि.आय.पी.रोड,वडोदरा गुजरात यांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह पो.हे. कॉ.एस.ए. कुडके यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.-304\2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106,281,125(ए)(ब)मोटार वाहन कायदा कलम 184,134(ए)(ब) प्रमाणे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.कुडके हे करीत आहेत.



