अपघात
मोटार अपघात,एक ठार,एक जखमी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका शिवारात आज सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास मयत महिला व तिचा मुलगा हे आपल्या दुचाकीने धोत्रे येथे एक कार्यक्रमास जात असताना त्यांना एका टाटा कंपनीच्या वाहनाने (क्रं.बी.एच.जे.एच,०५ टी.सी.२००५) दिलेल्या धडकेत वेस शिवारात रहिवासी असलेली महिला सरुबाई शांताराम पाडेकर (वय-५५) या जागीच ठार झाल्या असून त्यांचा मुलगा दिपक शांताराम पाडेकर (वय-३३) हा गंभीररित्या जखमी झाली असल्याचे माहिती उपलब्ध झाली असून यातील फिर्यादी ज्ञानेश्वर दिगंबर पाडेकर (वय-४५) यांनी सदर वाहन चालकाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान मयत सरूबाई पाडेकर यांचे पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांची एक मुलगी उत्तर प्रदेश येथील झांसी येथे असून त्यांना ही खबर मिळाली असून त्या वेसकडे तातडीने निघाले आहे.त्यांचा अंत्यविधी उद्या दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान वेस येथील स्मशान भूमीत होणार आहे.

कोपरगाव तालुक्यातून जात असलेला जुना मुंबई -नागपूर हा मार्गावर वर्तमानात स्थानिक वाहतूक वाढली असून रस्ता मात्र तीस वर्षानंतर ‘जैसे थे’ आहे.परिणामी त्या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे.अशीच घटना आज सकाळी दहिगाव बोलका हद्दीतील रेल्वे उड्डाण पुलाजवळ सकाळी ११.४५ वाजता घडली आहे.यातील जखमी सरूबाई पाडेकर व त्यांचा मुलगा दिपक पाडेकर हे दोघे आपल्या वाहनाने आपल्या धोत्रे येथील चुलत भावाच्या मेहुणीच्या तेराव्यासाठी जात असताना समोरून आलेल्या टाटा कंपनीच्या भरधाव जाणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली होती त्यात सरुबाई पाडेकर या जागीच ठार झाल्या असून आहे.त्यांचा मुलगा दिपक पाडेकर हा गंभीररित्या जखमी झाला आहे.

दरम्यान या अपघातानंतर त्यांना नजीकच्या नागरिकांनी उपचारार्थ संत जनार्दन स्वामी रुग्णालयात दाखल केले असून यांचेवर उपचार सुरू आहे.मयत सरूबाई पाडेकर यांचे पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांची एक मुलगी उत्तर प्रदेश येथील झांसी येथे असून त्यांना ही खबर मिळाली असून त्या वेसकडे तातडीने निघाले आहे.त्यांचा अंत्यविधी उद्या दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान वेस येथील स्मशान भूमीत होणार आहे.
दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलिस उपनिरीक्षक संजय पवार,पोलिस हेड कॉन्स्टेबल पी.डी.सोनवणे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.