जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

ट्रक अपघातात एक ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल स्वस्तिक समोर पंजाब मधील ट्रकने (क्रं.पी. बी.०७ बी.एस.४७४९) यावरील चालकाने दुचाकीला (क्रं.एम.एच.१७ डी.ए.६२६०) नुकत्याच दिलेल्या धडकेत राहाता तालुक्यातील रुई येथील रहिवासी सचिन नामदेवराव वाबळे (वय -५९) हे जखमी होऊन उपचार सुरू असतानानाशिक येथे मयत झाले असल्याचा गुन्हा राहुल मधुकर वाबळे(वय -४८) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

नगर-मनमाड रस्त्याच्या दुर्दशेचे दशावतार संपण्याची चिन्हे नाहीत.त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून रस्ता काही पूर्ण होऊ शकत नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हे काम पूर्ण होऊ शकले नाही.परिणामस्वरूप नगर जिल्ह्यासह राज्यातील महत्वाच्या निवडणुका पार पडून गेल्याने महापालिका आणि नगरपालिका,जिल्हा परिषद निवडणुका नेत्यांच्या दृष्टीने गौण असल्याने या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील नेते किती अपघातानंतर हा रस्ता पूर्ण करणार हा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

   कोपरगाव तालुक्यातुम जाणाऱ्या आणि उत्तर आणि दक्षिण भारतास जोडणाऱ्या नगर-मनमाड रस्त्याच्या दुर्दशेचे दशावतार संपण्याची चिन्हे नाहीत.त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून रस्ता काही पूर्ण होऊ शकत नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हे काम पूर्ण होऊ शकले नाही.परिणामस्वरूप नगर जिल्ह्यासह राज्यातील महत्वाच्या निवडणुका पार पडून गेल्याने महापालिका आणि नगरपालिका,जिल्हा परिषद निवडणुका नेत्यांच्या दृष्टीने गौण असल्याने या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही.त्यामुळे या रस्त्यावरील अपघातात कमी होण्याची दूरदूरपर्यंत शक्यता दिसत नाही.अशीच एक अपघाताची एक घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीत हॉटेल स्वस्तिक समोर घडली असल्याचे उघड झाले आहे.यातील मयत सचिन वाबळे हे आपल्या वरील क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना वरील क्रमांकाच्या पंजाबमधील ट्रकने मागील बाजूने त्यांना रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून जोराची धडक दिली होती.त्यात सचिन वाबळे हे गंभीररीत्या जखमी झाले होते.त्यांना नजीकच्या नागरिकांनी व नातेवाईकांनी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले होते.उपचारा दरम्यान त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांचेवर रुई येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

  दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर  पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलिस हे.कॉ.जालिंदर तमनर आदींनी धाव घेऊन स्थळपंचनामा केला आहे.

  कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४३५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम १०६(१)२८१,१२५,(अ ),(ब)३२४(४) प्रमाणे ट्रकवरील अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल तमनर  हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close