अपघात
…या रस्त्यावर बळींची संख्या उघड,नागरिकांत संताप!

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव ते शिडी महामार्ग दुरुस्तीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे.काम करताना आवश्यक काळजी न घेतल्याने व ठेकेदाराने कामात दिरंगाई व निष्काळजीपणा केल्यामुळे कोपरगाव शहरातील येवला नाका ते आत्मा मलिक रुग्णालय या साधारण चार कि.मी.अंतरात १ जानेवारी २०२० ते १ जून २०२५ या कालावधीत एकूण ५३ अपघातांची नोंद होऊन त्यात २१ जण मृत्युमुखी तर ३२ जणांना अपंगत्व आले असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.या अपघातास जबाबदार धरून रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मागणी कोपरगाव येथील लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.नितीन पोळ यांनी नुकतीच केली आहे.

“येवला नाका ते आत्मा मलिक रुग्णालया दरम्यान,कोपरगाव ते शिर्डी या रस्त्यावर १ जानेवारी २०२० ते १ जून २०२५ या कालावधीतील अपघातांची माहिती शहर पोलिसांकडे,माहिती अधिकारात विचारली होती.त्यात एकूण ५३ अपघातात २१ जण मृत्युमुखी तर ३२ जणांना अपंगत्व आले,तर इतर किरकोळ अपघातांची तक्रार पोलिसांकडे उपलब्ध नाही”-ॲड.नितीन पोळ,अध्यक्ष,लोकस्वराज्य आंदोलन.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्त्यांची वाट लागली आहे.त्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचं आहे.मात्र म्हणावा असा निधी मिळत नाही व तालुक्यातील रस्ते मात्र सुरळीत होत नाही हि तालुक्याची शोकांतिका आहे.नजीकच्या तालुक्यातील रस्ते मात्र चकाकताना दिसत आहे.त्यात मराठवाड्यातील तुलनेने मागास असलेल्या वैजापूर,गंगापूर,तालुका आणि येवला तालुका वरचढ ठरताना दिसत आहे.शेजारी संगमनेर,सिन्नर,निफाड तालुक्यातील कोणतेही रस्ते नादुरुस्त असल्याचे दिसत नाही.मात्र राजकारणात पुढारलेल्या अ.नगर जिल्ह्यातील प्रवेश केला की वाहतूकदारांना नगर जिल्ह्यात आल्याची चाहूल लागते ती मोठमोठ्या खड्डयांनी.त्यामुळे स्वाभाविक पणे त्यांच्या तोंडी शेलकी विशेषणे न आली तर नवल ! नगर मनमाड या रस्त्याची दुरावस्था गेल्या २५ वर्षात प्रस्थापितांना मार्गी लावता आली नाही.तीच बाब तळेगाव दिघे मार्गे जाणाऱ्या झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याची. या रस्त्याचे काम मागील उन्हाळ्यात कोल्हार येथील जगताप आणि कंपनीने घेतले होते.त्या कामाला एक महिना उलटत नाही तोच या रस्त्याची आगामी महिन्यात पावसाळा आहे याची चाहूल लागताच सदर रस्ता नादुरुस्त झाला होता.या रस्त्याची तब्बल तीन वर्षे ठेकेदार कंपनीकडे हमी असताना एक महिन्यात वाट लागली.झगडे फाट्याजवळ नुकत्याच संपलेल्या उन्हाळ्यात २०० मीटरचे दुसऱ्या
या ०५ कोटीच्या टप्प्यातील काम केले.अद्याप भगवतवाडी जवळ,अंजनापूर शिवारात हे काम करण्याचे बाकी असताना त्याचे वाभाडे निघाले आहे.मागील खड्डे बुजवून महिना उलटत नाही तोच पुढे पाठ मागे सपाट अशी सार्वजनिक बांधकाम विभागाची नवीन शैली चर्चेचा विषय ठरली आहे.
नगर मनमाड मार्गावर कोपरगाव बेट आणि पुणतांबा चौफुलीवर वेगळी बाब नाही.या ठिकाणी पर्यायी मार्ग काढून न देताच प्रवाशांचे बळी घेण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यातील बळींची संख्या हाती आली नव्हती मात्र आता ते काम ॲड. पोळ यांनी केले आहे.

ॲड.नितीन पोळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की,”येवला नाका ते आत्मा मलिक रुग्णालया दरम्यान,कोपरगाव ते शिर्डी या रस्त्यावर १ जानेवारी २०२० ते १ जून २०२५ या कालावधीतील अपघातांची माहिती शहर पोलिसांकडे,माहिती अधिकारात विचारली होती.त्यात एकूण ५३ अपघातात २१ जण मृत्युमुखी तर ३२ जणांना अपंगत्व आले,तर इतर किरकोळ अपघातांची तक्रार पोलिसांकडे उपलब्ध नाही अशी माहिती हाती आली आहे.

कोपरगाव ते अहिल्यानगर रस्त्याची अनेक वर्षापासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गमध्ये करण्यात आला, काँक्रिटीकरणास मंजुरी मिळाली. रस्त्याचे काम सुरू झाले.मात्र ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक होते.काम सुरू असताना वाहतुकीची कोंडी व अडथळे टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे होते.मात्र राजकीय नेत्यांची अनास्था व प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांचे बळी गेले तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले.

दरम्यान राजकीय नेत्यांनी अनेकदा ठेकेदारास काळ्या यादीत टाकू,अशी राणभिमदेवी थाटाची घोषणाही केली.मात्र कामात प्रगती होण्याऐवजी ठेकेदाराला कामात मुदतवाढ मिळाली.झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याच्या ठेकेदाराची तक्रार विधिमंडळाच्या करण्यात आली.प्रत्यक्षात या रस्त्यावरील अपघातांच्या कारणांची चर्चा होणे व शासन स्तरावरून ठेकेदारावर कामातील दिरंगाईवर कारवाई होणे,आवश्यक होते. याकडे ॲड.पोळ यांनी लक्ष वेधले.राज्याच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात आ.आशुतोष काळे यांनी उशिरा का होईना या रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे मात्र राज्याच्या तिजोरीची तोळा मासा अवस्था पाहता खरेच या अनेक दशके रखडलेल्या रस्त्यांचे काम मार्गी अधिवेशना नंतर खरेच मार्गी लागणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे.की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची ही बेगमी आहे अशी नागरिकांत चर्चा सुरू झाली आहे.