जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

रस्ता अपघात ०१ ठार,०७ जखमी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल संस्कृती समोर ट्रॅक्टर,ट्रॉली व एक प्रवासी रिक्षाचा (एम.एच.१७ बी. झेड.०३७०) भीषण अपघात होऊन एक जण ठार तर ०७ जण गंभीर जखमी झाले आहे असल्याची धक्कादायक माहिती हाती आहे.मृतात वाल्मीक नाना घनघाव (वय- ६०) रा.पिंपळस ता.निफाड  यांचा समावेश आहे.

अपघातग्रस्त रिक्षा.

दरम्यान या अपघातातील जखमींत
रेखा लोखंडे खिर्डी गणेश (वय -५३),
सगुनाबाई पवार (वय -४०),गौरी पाईक, (वय -१५),सायली त्रिभुवन, (वय -१८) अतुल बैरागी (वय -४०) (चालक),निशा पाईक, (वय -३५),सलीम रज्जाक सय्यद (वय -३२),सर्व रा.येसगाव आदी सहा जणांचा समावेश आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातग्रस्त ट्रॅक्टर.

  नगर मनमाड रस्त्याचे शुक्लकाष्ठ संपण्याची वर्तमान लोकप्रतिनिधींच्या व मंत्र्याच्या काळात सुतराम शक्यता दिसत नाही.परिणामी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशी आणि नागरिकांना थेट मरण्या आणि मारण्यासाठीच सोडून दिल्याचे विदारक चित्र दुर्दैवाने निर्माण झाले आहे.हजारो कोटी मंजूर करा आणि त्याचा अधिकारी आणि नेत्यांनी भ्रष्टाचार करून प्रवाशांना मरण्यास सोडून द्या अशी विदारक वर्तमान स्थिती आढळून येत आहे.उच्च न्यायालय आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीही या उत्तर नगर जिल्ह्यातील नेते आणि अधिकाऱ्यांपुढे सपशेल हात टेकले आहे.त्यामुळे या भागातील आणि या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी अवजड वाहनचालक आदींनी मोठी जोखीम पत्करून आपल्या बळावरच प्रवास करणे इष्ट.त्यामुळे पुणतांबा फाटा,बेट नाका,झगडे फाटा ते वडगाव पान, पुणतांबा मार्गे श्रीरामपूर रस्ता आदी मार्ग मृत्युपथ बनले आहे.परिणामी अनेक निष्पाप जीव यात बळी जात आहे.अशीच घटना काल रात्रीच्या १० बाजेच्या सुमारास येसगाव ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल संस्कृती समोर घडली आहे.
  यातील अपघातग्रस्त निळ्या रंगाचा ट्रॅक्टर नादुरुस्त झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता.मात्र नेहमीच्या आपल्या राष्ट्रीय सवयीप्रमाणे त्यास परावर्ती (रिफ्लेक्टर ) नसल्याने मागून भरधाव वेगाने येणाऱ्या प्रवासी रिक्षास तो दिसला नाही आणि परिणाम जो व्हायचा तो झाला आहे.सदर ट्रॅक्टर- ट्रेलरला मागून येणारी प्रवासी रिक्षा धडकल्याने सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

   यात रिक्षाचे मोठे नुकसान झालेच पण या धडकेत वाल्मीक नाना घनघाव (वय- ६०)  रा. पिंपळस तालुका निफाड हे उपचारादरम्यान मयत झाले आहे.

   दरम्यान या अपघातातील जखमींत रेखा लोखंडे खिर्डी गणेश (वय -५३),सगुनाबाई पवार (वय -४०),गौरी पाईक, (वय -१५),सायली त्रिभुवन, (वय -१८) अतुल बैरागी (वय – ४०) (चालक),निशा पाईक, (वय – ३५),सलीम रज्जाक सय्यद (वय – ३२),सर्व रा.येसगाव आदी ०७ जणांचा समावेश आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली  असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.वलवे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close