अपघात
… या तालुक्यात एका इसमाचे निधन

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला व बांधकाम व्यावसायिक असलेला मूळ राजस्थानी इसम भगवान रामदेव वर्मा (वय-५५) याचे आज सकाळी १० वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यास उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केलं असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.त्याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आज सकाळी १० वाजेच्या सुमारास राजस्थानी इसम भगवान वर्मा हा कामावर जण्याची तयारी करत असताना त्याला अचानक हृदय विकाराचा तीव्र धक्का आला असता तो अत्यवस्थ झाला होता.त्याला नजीकच्या ग्रामस्थांनी उपचारासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात येथे दाखल केला होता.त्या ठिकाणी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.
राज्यात विविध मजुरीचे व कुशल अकुशल कामे करण्यास मजुर मिळत नाही परिणामी उत्तर नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजस्थान,बिहार,उत्तर प्रदेश,झारखंड आदी परप्रांतीय मजुर आणि कुशल मजुर आपले भविष्य शोधण्यासाठी येत असतात.असाच एक इसम भगवान रामदेव वर्मा हा कोपरगाव तालुक्यातील धामोरी या ठिकाणी कामासाठी काही महिन्यांपूर्वी आलेला होता.आज सकाळी १० वाजेच्या सुमारास कामावर जण्याची तयारी करत असताना त्याला अचानक हृदय विकाराचा तीव्र धक्का आला असता तो अत्यवस्थ झाला होता.त्याला नजीकच्या ग्रामस्थांनी उपचारासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात येथे दाखल केला होता.त्या ठिकाणी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.
दरम्यान घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी व पोलिस हे. कॉ.संदीप बोटे यांनी भेट दिली आहे.व पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-४७/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.संदीप बोटे हे करीत आहेत.