जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

अपघातात तरुण ठार,उशिरा गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत झेड कॉर्नर या ठिकाणी आपल्या ताब्यातील स्प्लेंडर या दुचाकीवरून (क्रं.एम.एच.१७ डी.ए.२५८०) भरधाव वेगाने जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या बोर्डास दिलेल्या धडकेत मायगाव देवी (मूळ रा.रोहिणी ता.चाळीसगाव जि.जळगाव) येथील दुचाकीस्वार दिपक सुखदेव वाघ (वय-३५) ठार झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धामोरी येथील पोलिस पाटील संगीता विजय ताजणे यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  

दरम्यान कोपरगाव-धामोरी मार्गावरील धोकादायक असलेला व अनेकांचा जीव घेणारा झेड कॉर्नर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने ताबडतोब काढून टाकावा अशी मागणी धामोरी आदी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.अन्यथा या परिसरातील ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

    कोपरगाव तालुक्यातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.निधीचे आकडे हे आकाशाला गवसणी घालणारे असले तरी वास्तविकता वेगळी असल्याने अनेक नागरिकांना,प्रवाशांना,वाहन धारक आदींना जीवित आणि आर्थिक किंमत चुकवावी लागत आहे.त्यातून बांधकाम विभाग आणि राजकीय व्यवस्थेवर प्रकाशझोत पडल्याशिवाय राहत नाही.शेजारी असलेल्या मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यात रस्त्यांची स्थिती अत्यंत मजबूत दिसत असली तरी तुलनेने कोपरगाव तालुका आणि मतदार संघ हा अद्यापही पन्नास वर्षे पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.त्यातून दिवसेंदिवस नागरिकांचे बळी जात आहे.अशीच घटना १९ मार्च २०२५ रोजी रात्री ८.३० वाजेच्या  सुमारास घडली होती.या घटनेतील मयत तरुण हा आपल्या वरील क्रमांकाचे दुचाकीवरून जात असताना धामोरी हद्दीत झेड कॉर्नर या धोकादायक ठिकाणी त्याने तेथे असलेल्या लोखंडी बोर्डास जोराची धडक दिली होती.त्यात दिपक सुखदेव वाघ या तरुणाचे निधन झाले आहे.

    दरम्यान कोपरगाव-धामोरी मार्गावरील धोकादायक असलेला व अनेकांचा जीव घेणारा झेड कॉर्नर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने ताबडतोब काढून टाकावा अशी मागणी धामोरी आदी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.अन्यथा या परिसरातील ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

   या प्रकरणी धामोरी येथील पोलिस पाटील महिला संगीता ताजणें यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१८०/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम १०६(१),२८१,१२५,(बी),३२४(४),मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे मयत इसमा विरुध्द आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस हे. कॉ.डी.एस.बोटे आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.संदीप बोटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close