अपघात
दोन वाहनात धडक,एक ठार,गुन्हा दाखल!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिर्डी नाशिक मार्गावर आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या हिरो स्पेलंडर प्लस या दुचाकीला (क्रं.एम.एच.१७ डी.जी.१६९८) मारुती व्हिटारा ब्रिझा या चार चाकी वाहनाने (क्रं.एम.एच.१५ जी.एल.९८६८) जोराची धडक दिल्याने त्यात देर्डे कोऱ्हाळे येथील इसम भास्कर मधुकर माळी (वय -५०) हे गंभीर रित्या जखमी झाले होते.त्यांना नजीकच्या ग्रामस्थांनी उपचारार्थ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मढी फाटा येथील अपघातात चार चाकी वाहन पांढऱ्या रंगाची मारुती व्हिटारा ब्रिझा हिचे वरील चालकाने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवले आहे.व एका हिरो स्पेलंडर या दुचाकीस जोराची धडक दिली आहे.त्यात भास्कर माळी हे गंभीर जखमी झाले असून नंतर ते मृत पावले आहे.
कोपरगाव तालुक्यात एकीकडे शिर्डी ते नाशिक हा रस्ता चार पदरी बनला असून परिणामी या मार्गावर वाहने सुसाट प्रवास करत आहेत.समृध्दी महामार्ग होण्याचे आधी हा रस्ता शिर्डी साठी प्रसिध्दी होता.मात्र समृध्दी वर आता लांब पल्ल्याची वहाने प्रवास करत असली तरी जुन्या शिर्डी-नाशिक मार्गाने सुद्धा वाहने सुसाट प्रवास करत आहे.परिणामी अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे.दुसरीकडे कोपरगाव तालुक्यात रस्त्याची वाट लागली आहे.त्यामुळे अपघातांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.

दरम्यान अशीच घटना आज सकाळी ९.३० वाजता मढी फाटा या ठिकाणी घडली आहे.यातील चार चाकी वाहन पांढऱ्या रंगाची मारुती व्हिटारा ब्रिझा असून तिने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवले आहे.व एका हिरो स्पेलंडर या दुचाकीस जोराची धडक दिली आहे.त्यात भास्कर माळी हे गंभीर जखमी झाले होते.त्यांना नजीकच्या नागरिकांनी शिर्डी येथील साई बाबा संस्थांच्या रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

दरम्यान या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.या प्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये शिर्डीत अकस्मात मृत्यूची नोंद करून हा गुंन्हा शून्य क्रमांकाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.तालुका पोलिसांनी तो क्रं.३६/२०२५ अन्वये नोंदवला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.एम.बी.दहिफळे हे करीत आहेत.