अपघात
वाहन अपघात,एक ठार एक जखमी,गुन्हा दाखल

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या नजीक नगर-मनमाड मार्गावर असलेल्या जनार्दन स्वामी मंदिराजवळ असलेल्या रस्त्यावर काल सायंकाळी ५.३० वाजेच्यां सुमारास हरियाणातील एका कंटेनरने (क्रं.एच.आर.३८ ए.एन.१०६१) ने दुचाकीस (क्रं.एम.एच.१७ ए.एच.१०४१)दिलेल्या धडकेत येवला येथील तरुण हाफिज रफिक शहा (वय-३६) हा तरुण ठार झाला असून सावळीविहीर येथील इसम शिवाजी अर्जुन थोरात (वय-५३) हे जखमी झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहरपोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर-मनमाड या रस्त्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना थेट जनतेची नुकतीच माफी मागावी लागली आहे.मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील स्थानिक बडे पुढारी आणि नेत्यांनी साधी सहानुभूती व्यक्त केल्याचे कधी आढळून आलेले नाही हे विशेष !परिणामी अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे.वित्तीय हानी झाली ती वेगळीच आहे.यात टक्केवारी मुळे तीन ठेकेदार बदलले आहे.परिणामी ठेकेदार नगर जिल्ह्यात दम धरण्यास तयार नाही.
उत्तर भारतात जोडणाऱ्या नगर-मनमाड मार्गाचे काम खूपच मंद गतीने सुरू आहे.परिणामी या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे साधे कामही संबधित ठेकेदार करत नसल्याचे वारंवार उघड होत आहे.यात सामान्य प्रवाशी आणि अवजड वाहन चालक याचे जिवानिशी मोठे नुकसान होत आहे.या रस्त्याची थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना थेट जनतेची नुकतीच माफी मागावी लागली आहे.मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील स्थानिक बडे पुढारी आणि नेत्यांनी साधी सहानुभूती व्यक्त केल्याचे कधी आढळून आलेले नाही हे विशेष !परिणामी अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे.वित्तीय हानी झाली ती वेगळीच आहे.यात ठेकेदार तीन बदलले आहे.कारण यात स्थानिक पुढारी टक्का घेत असल्याने ठेकेदार नगर जिल्ह्यात दम धरण्यास तयार नाही याबाबत मागील निवडणुकीत नितीन गडकरी यांनी स्थानिक नेत्यांचा थेट मोठ्या व्यासपीठावरून दटावले होते व त्यांची बेइज्जती केली होती.तरीही या नेत्यांना काहीही सोयर सुतक आढळून आलेले नाही.या नादुरुस्त रस्त्यामुळे अनेक अपघातांना निमंत्रण भेटत असून अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे.अशीच घटना काल सायंकाळी ५.३० वाजता जनार्दन स्वामी मंदिराजवळ घडली असून यातील दुचाकीस्वारास मागून येणाऱ्या हरियाणाच्या कंटेनरने जोराची धडक दिली होती.त्यात हाफिज शहा हा येवला येथील तरुण गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावला आहे.तर त्याचा सहकारी सावळीविहीर येथील इसम शिवाजी अर्जुन थोरात हे गंभीर जखमी झाले आहे.यात शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारार्थ दाखल केलं होते.घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक संजय पवार व हे.को.बी.एस.कोरेकर यांनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जखमी फिर्यादी शिवाजी थोरात यांनी गुन्हा क्रं.भारतीय न्याय संहिता कलम १०६(१),२८१,१२५,(अ),(ब),३२४,मोटार वाहन कायदा कलम १३४(अ)(ब)१८४,१७७ प्रमाणे आरोपी विरुध्द दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे. कॉ.बी.एस.कोरेकर हे करत आहेत.