अपघात
भरधाव डंपरने घेतला तरुणाचा बळी !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार हद्दीत रोडच्या लगत आपल्या मोबाईलवर बोलत असताना वेगाने जाणाऱ्या वाळू वाहक डंपरने त्यास जोराची धडक दिली असून त्यात
रवंदे येथील रहिवासी तरुण हर्षद तानाजी धुळे (वय-१९)याचे निधन झाले आहे.त्यात सदर युवकास आपले हात आणि पाय गमवावे लागले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे रवंदे आणि सांगवी भुसार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयत तरुण हर्षद धुळे हा रवंदे येथील रहिवासी असून त्याला फोन आल्याने तो रस्त्यालगत उभा असताना त्याला वेगाने जाणाऱ्या हायवा डंपरने जोराची धडक दिली होती.त्या धडकेत त्याला दूरपर्यंत या डंपरने फरफटत नेले होते ते अपघातात त्याचे निधन झाले आहे.
कोपरगाव तालुक्यात वर्तमानात वाळू चोरांचा हैदोस सुरू आहे.त्यातून गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.शिवाय अनेकांना आपले जीव हकनाक गमवावे लागत आहे.अशीच घटना सांगवी भुसार येथे घडली आहे.त्यातील मयत तरुण हा रवंदे येथील रहिवासी असून त्याला फोन आल्याने तो रस्त्यालगत उभा असताना त्याला वेगाने जाणाऱ्या हायवा डंपरने जोराची धडक दिली होती.त्या धडकेत त्याला दूरपर्यंत या डंपरने फरफटत नेले असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.त्याला नजीकच्या नागरिकांनी उपचारार्थ कोपरगाव कडे रवाना केले असता उपचारादरम्यान त्याचे निधन झाले आहे.त्यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.