जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

रस्ता अपघातात महिला ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी असलेली महिला रंजना बाळासाहेब सोनवणे (वय-५०) ही जुना मुंबई-नागपूर या रस्त्याने जात सायंकाळी ५.३० वाजता आपल्या कामानिमित्त आपल्या पतीसह दुचाकीवरून जात असताना तिला संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल जवळ एका कुत्र्याने जोराची धडक दिल्याने त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती तिला उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात भरती केले असता तेथे उपचार करताना तिचे निधन झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान स्व.रंजना सोनवणे यांच्यावर काल दिनाक ०५ जानेवारी रोजी ३.३० वाजता संवत्सर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

  भारतात दरवर्षी ४.६ लाख अपघात होतात आणि १.६८लाख मृत्यू होतात आणि त्यामुळे भारताच्या जीडीपीच्या अंदाजे तीन टक्के आपण गमावत आहोत.यापैकी ३३ टक्के अपघात हे आपल्या राष्ट्रीय महामार्गांवर होतात.यापैकी ६० टक्के मृत्यू हे १८ ते ३४ वयोगटातील लोकांचे आहेत.अतिरेकी संघटनांशी लढतानाही मृतांची संख्या खूपच कमी आहे. आम्ही लढलेल्या युद्धांमध्येही मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे.ही कबुली दिली आहे केंद्रीय रस्ते विकास मंत्री  नितीन गडकरी यांनी लोकसभेत.आणि देशाचे हेच वास्तव आहे.यापासून आम्ही कोणताही बोध  घेण्याची शक्यता नाही सरकारने दंडाची रक्कम वाढवून  काही उपयोग झालेला नाही.त्यामुळे हे मृत्यू दिवसेंदिवस वाढत आहेत.अशीच घटना नुकतीच कोपरगाव नजिक असलेल्या कोकमठण हद्दीत घडली आहे.यातील मयत महिला ही संवत्सर येथील रहिवासी असून ती आपल्या पतीसह आपल्या दुचाकीवरून काही कामानिमित्त जुना मुंबई-नागपूर या महामार्गाने दि.०३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुणताब्याच्या दिशेने जात असताना तिला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली होती.त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती.तिला नजीकच्या नागरिकांनी उपचारार्थ शिर्डी येथील साई रुग्णालयात दाखल केले होते.तेथे वैद्यकीय उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिला वाचविण्यात अपयश आले असून तिचे तेथे निधन झाले आहे.या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आधी शिर्डी पोलिसांना खबर दिली होती त्यांनी शून्य क्रमांकाचा गुन्हा दाखल करून तो नंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.सदर घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी भेट दिली आहे.

दरम्यान तिच्यावर काल दिनाक ०५ जानेवारी रोजी ३.३० वाजता संवत्सर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.या निधनाबद्दल गोदावरी-परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

   दरम्यान याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी नोंद क्रं.००३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १९४ प्रमाणे दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.जालिंदर तमनर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close