अपघात
अपघातात एकाचा मृत्यू,ओळख पटविण्याचे आवाहन

न्युजसेवा
अहिल्यानगर- (प्रतिनिधी)
निंबळक शिवारातील बायपास रोड येथे झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडलेल्या अनोळखी व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी संपर्क साधावा,असे आवाहन एमआयडीसी पोलीस स्थानकाने केले आहे.

‘मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे,शरीर बांध जाड,उंची अंदाजे १६५ सेमी,वर्ण सावळा-काळसर,अंगात विटकरी रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट आणि निळी पँट आहे.
या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.त्याच्या नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींनी पुढे येऊन ओळख पटवावी”- एम.आय.डी.सी.पोलिस,अ.नगर.
हा अपघात लामखेडे पेट्रोलपंपाजवळ पुणे हायवे रोडवर १ मे २०२३ रोजी झालेला आहे.अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह सिव्हील हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे नेऊन पोस्टमार्टम करण्यात आला.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे,शरीर बांधा जाड,उंची अंदाजे १६५ सेमी,वर्ण सावळा-काळसर,अंगात विटकरी रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट आणि निळी पँट आहे.
या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.त्याच्या नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींनी पुढे येऊन ओळख पटवावी,असे आवाहन एमआयडीसी पोलीस स्थानकाच्यावतीने करण्यात आले आहे.