अपघात
दोन वाहनांची धडक,तीन जखमी,गुन्हा दाखल

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव तालुक्यातील माऊली मंदिराचे पुढे नुकत्याच झालेल्या टाटा एस.छोटा हत्ती क्रं.एम.एच.14 जी.डी.5725 व लाल रंगाचा वीना क्रमांकाचा महिंद्रा ट्रॅक्टर या दोन वाहनाच्या धडकेत वाल्मीक गंगाधर साळुंके,गांधीनगर कोपरगाव,मद्रास मुराज्या जाधव प्रमिला मद्रास जाधव जिं.बडवाणी आदी तीन जण जखमी झाले असून त्या आरोपी रवींद्र बबन शिंदे रा.पढेगाव याचे विरुध्द फिर्यादी श्रीकांत गंगाधर साळुंके (वय-44) गांधीनगर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहराच्या ईशान्य दिशेस सहा किमी अंतरावर घडली असून मजूर घेऊन जाणाऱ्या एक टाटा कंपनीच्या छोट्या हत्तीस समोरून येणाऱ्या वीना क्रमांकाच्या लाल रंगाच्या महिंद्रा ट्रॅक्टरने जोराची धडक दिली त्यात वाल्मीक गंगाधर साळुंके,गांधीनगर कोपरगाव,मद्रास मुराज्या जाधव प्रमिला मद्रास जाधव रा.नेवाली बुजुर्ग,तालुका नेवाली,जिल्हा बडवाणी आदी तीन जण जखमी झाले आहे.
कोपरगाव तालुक्यातील जुना कोपरगाव ते वैजापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे.त्यामुळे अपघातात मोठी वाढ झाली आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहराच्या ईशान्य गडाच्या सहा किमी अंतरावर घडली असून यात वरील क्रमांकाच्या मजूर घेऊन जाणाऱ्या एक टाटा कंपनीच्या छोट्या हत्तीस समोरून येणाऱ्या वीना क्रमांकाच्या लाल रंगाच्या महिंद्रा ट्रॅक्टरने जोराची धडक दिली होती.त्या धडकेत वाल्मीक गंगाधर साळुंके,गांधीनगर कोपरगाव,मद्रास मुराज्या जाधव प्रमिला मद्रास जाधव रा. नेवाली बुजुर्ग,तालुका नेवाली,जिल्हा बडवाणी आदी तीन जण जखमी झाले आहे.दरम्यान घटनेतील आरोपी रवींद्र बबन शिंदे रा.पढेगाव याचे विरुध्द फिर्यादी श्रीकांत गंगाधर साळुंके (वय-44) गांधीनगर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-378/2024 भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 281,125(ए),(बी)324,(4)(5) मोटार वाहन कायदा कलम 184,134(ए)(बी) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी, पो.हे.कॉ.निजाम शेख यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.शेख हे करीत आहेत.