जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

बस चालक-वाहकास मारहाण,एकावर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव – (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील नगर-मनमाड रस्त्यावर जियो पेट्रोल पंपाजवळ राज्य परिवहन मंडळाच्या नांदगाव बस आगाराची बस घेऊन जात असताना त्यावरील चालक व वाहन यांना आरोपी किसन आण्णासाहेब वराडे याने आपल्या ताब्यातील टाटा एर्टिगा (क्रं.एम.एच.06 बी.यू.6700) आडवी घालून,” तू,मला का दाबले” असा आरोप करून त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा गुन्हा फिर्यादी समाधान बद्रीनाथ सोनवणे (वय -31) रां.दहेगाव तालुका नांदगाव यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे येसगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

 

मारुती एर्टीगा वरील चालक किसन आण्णासाहेब वराडे याने आपली गाडी आडवी घातली व चालक यास म्हणाला की,”तू,मला का दाबले” असा आरोप केला त्यावेळी फिर्यादी यांनी,”आपण असे काही केले नाही व बसला धक्का लागलेला नाही” असा जबाब दिला असता त्याचा राग येऊन त्याने चालक व वाहक नामदेव पाटील आदींना खाली खेचून आपल्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी इसम  समाधान सोनवणे हे नांदगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस आगराचे चालक असून ते आपल्या ताब्यातील परळी- नांदगाव ही बस (क्रं.एम.एच.14 बी.टी.4174 ) ही घेऊन दिनांक 06 ऑगस्ट रोजी दुपारी 04.50 वाजता नगर -मनमाड रस्त्याने येसगावं शिवारातून जात असताना सदरची बस ही जियो पेट्रोल पंपाच्या समोर आली असताना त्यांच्या बसला वरील क्रमांकाची मारुती एर्टीगा वरील चालक किसन आण्णासाहेब वराडे याने आडवी घातली व त्या वरील चालक समाधान सोनवणे यास म्हणाला की,”तू,मला का दाबले” असा आरोप केला त्यावेळी फिर्यादी यांनी,”आपण असे काही केले नाही व बसला धक्का लागलेला नाही” असा जबाब दिला असता त्याचे समाधान झाले नाही.त्याने त्याने चालक व वाहक नामदेव पाटील आदींना खाली खेचून आपल्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व सरकारी कामात अडथळा आणला आहे.अशी फिर्याद दाखल करून त्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.284/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 126(2),132,121,(1),324,(4),352 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कूसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close