जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

क्लीनरची सावधानता,अपघात टळला मात्र चालकांचा मृत्यू

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड महमार्गावर आज मध्यरात्री १२.१५ वाजेच्या सुमारास पंजाब मधील रोगला सांगून येथील ट्रक चालक बलविंदरसिंग मागेल सिंग (वय-४९) हा आपल्या ताब्यातील ट्रक चालवत असताना त्यास अचानक फिट येऊन तोंडातून फेस निघू लागल्यावर सावध असलेल्या क्लीनर सनी सोनू चंडाल (वय-१८) याने वेळीच सावधानता दाखवत सदर ट्रक आपल्या ताब्यात घेऊन वेळीच रस्त्याच्या एका बाजूस लावल्याने राज्य मार्गावर मोठा अपघात टळला असल्याने सदर क्लीनरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  

कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात अचानक चालकास फिट आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व तोंडातून फेस असल्याची बाब क्लीनर सनी चांडाल याचे लक्षात आली असता त्याने सावधानता बाळगत गाडीवर नियंत्रण मिळवले असून सदर गाडी रस्त्याच्या एक बाजूस सावरून उभी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.त्याच्या या सावधानतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”जगात दरोरोज सुमारे ३४०० लोक रस्त्यावर अपघातामुळे मृत्‍युमुखी पडतात.१० लक्ष दक्ष लोकांना इजा होत असते किंवा ते अपंग होत असतात.रस्‍त्‍यांवर लहान मुले,वयोवृध्‍द व सायकल चालवऱ्यांना अपघाताचा सर्वात जास्‍त धोका संभवतो.देशभरात वर्षभरात अपघातातून जवळपास दिड लाख लोक मृत्युमुखी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.अपघात होण्‍यास कारणीभूत मानवी घटकात वाहन चालक व रस्‍ता उपयोगात आणणाऱ्या सर्व घटकांचा समावेश होतो.उदा.वाहन चालकाची वागणूक,मद्यधुंद अवस्था,कमजोर नजर व श्रवण शक्‍ती निर्णय क्षमता आदी.१९८५ साली इंग्रज व अमेरिकेत अपघाताच्या माहितीत वाहन चालकाची चुक,मद्य धुंद अवस्था,अमली पदार्थाचा अमल ९३ टक्के वाहतुक अपघातास जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.भारतात वेगळी अवस्था नाही.त्यामुळे हे अपघात कमी करणे गरजेचे असून या बाबत केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले असल्याचे दिसत आहे.मात्र चालक व वाहक यांनी यात काही नियम व सावधानता पाळली तर बरेच अपघात कमी होऊ शकतात.याची चुणूक नुकतीच कोपरगाव तालुक्यात घडली असून काल मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबमधून काही माल घेऊन चालक बलविंदरसिंग हा चालला असताना कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात अचानक चालकास फिट आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व तोंडातून फेस असल्याची बाब क्लीनर सनी चांडाल याचे लक्षात आली असता त्याने सावधानता बाळगत गाडीवर नियंत्रण मिळवले असून सदर गाडी रस्त्याच्या एक बाजूस सावरून उभी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.अन्यथा किती बळी गेले असते याचा काही तपास लागला नसता.त्यामुळे क्लीनर सनी चांडाल याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  दरम्यान सदर गाडी उभी करून त्याने सदर चालकास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.क्लीनरने त्यानंतर सदर घटना कोपरगाव तालुका पोलिसांच्या निदर्शनास आणली आहे.

  दरम्यान घटना स्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी,पो.हे.कॉ.एन.एस.शेख यांनी भेट दिली आहे.व कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्र.२७/२०२४ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शाखाली पो.हे.कॉ.शेख करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close