जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

 दोन दुचाकींचा अपघात,एक जखमी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील पुणतांबा रोडवरील समृद्धी पुलाच्या जवळ युनिकॉर्न व स्प्लेण्डर दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात कोपरगाव शहरातील सोनार वस्ती येथील एक दुचाकीस्वार किरण एकनाथ मोहिते (वय-२८) जखमी झाला असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जखमी यांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

आरोपी अरुण छगन पवार हा परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जात असतांना फिर्यादीचे दुचाकीस जोराची धडक दिली आहे.त्यात किरण एकनाथ मोहिते यांचा उजवा पाय,मोडला असून डोक्याला व डाव्या हाताच्या बोटे मोडली असल्याची माहितीआहे.


 
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-संगमनेरसह पुणतांबा फाटा ते पुणतांबा रस्त्याची दुर्दशा अद्याप संपलेली नाही.नगर-मनमाड रस्त्याचे काम धीम्या गतीने सुरू आहेत्यामुळे अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे.अशीच घनता नुकतीच पुणतांबा फाटा ते पुणतांबा रस्त्यावर समृद्धीच्या पुलानजीक घडली आहे.त्यात फिर्यादी किरण मोहिते हे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण दि.११ मे रोजी दुपारी ०३ वाजेच्या सुमारास आपल्या होंडा युनिकॉर्न (क्र.एम.इह.१७ सी.डब्ल्यू.८०६५) दुचाकीवरून कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील कारवाडी येथून पुणतांबा रोडने कोपरगावकडे जात असताना त्यांची दुचाकी ही पुणतांबा रोडवरील समृद्धी महामार्गाच्या जवळ असताना कोपरगावकडून धारणगाव येथील एक दुचाकी स्वार (क्र.एम.एच.१७ सी.वाय.७०२२) अरुण छगन पवार हा परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जात असतांना फिर्यादीचे दुचाकीस जोराची धडक दिली आहे.त्यात किरण एकनाथ मोहिते यांचा उजवा पाय,मोडला असून डोक्याला व डाव्या हाताच्या बोटे मोडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

   दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी भेट दिली आहे व परिस्थितीची पाहणी केली आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२३३/२०२४ भा.द.वि.२७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम-१८४,१७७  प्रमाणे ऑरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close