अपघात
दुचाकी ऊस जुगाडावर धडकला,एक ठार,एक जखमी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत वैजापूर रस्त्यावर नुकतेच पहाटेच्या २.१५ वाजेच्या सुमारास संजीवनी सहकारी साखर कारखाण्याचे नादुरुस्त होऊन रस्त्यात पडलेले ऊस जुगाड अंधारात न दिसल्याने मागील बाजूने कासली येथील तरुण अक्षय संपत साबळे हा २२ वर्षीय तरुण ठार झाला असून दुसरा तरुण अजित बाबासाहेब भंडारी हा गंभीर जखमी झाला असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”वर्तमानात कोपरगाव तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून त्यासाठी ऊस वाहतुकीसाठी ऊस जुगाडाने वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते.सदर जुगाडांना अनधिकृत मागील बाजूने रात्रीच्या सुमारास अपघात प्रतिबंधक परावर्ती रेडियम लावण्याची सक्ती केलेली आहे.मात्र बऱ्याच वेळा हे अनधिकृत वाहतूक करणारे जुगाड चालक त्याचे पालन करताना दिसत नाही.परिणामी रात्रीच्या सुमारास पुढील तीव्र प्रकाश झोताचे वाहन आल्यास पुढील बाजूस नादुरुस्त असलेले जुगाड दिसत नाही.परिणामी वाहन चालक हा त्यावर धडकून मोठा अपघात होताना दिसत आहे.या अशा घटना वांरवार होताना दिसत आहे.मात्र त्याला सहकारी साखर कारखाने मात्र दखल घेताना दिसत नाही.परिणामी अनेक नागरिकांना आपले प्राण हकनाक गमवावे लागत आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून यातील कोपरगाव तालुक्यातील कासली ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला मयत तरुण अक्षय संपत साबळे हा अशाच जुगाडावर मागील बाजूने धडकून ठार झाला आहे.तर त्याचा सहकारी अजित बाबासाहेब भंडारी (वय-२३) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.हि घटना दि.१० जानेवारी रोजी पहाटे २.१५ वाजता घडली होती.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी भेट दिली आहे.दरम्यान आधी या प्रकरणी अकस्मात गुन्हा क्रं.५/२०२४ सी.आर.पी.सी.कलम १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.त्याचा तपास केला असता हा अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.त्याबाबत नागरिकांनी शहर पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
या प्रकरणी फिर्यादी संपत शिवराम साबळे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शंकरराव कोल्हे (संजीवनी) सहकारी साखर कारखाण्याचे जुगाड क्रं.७० चा वापरकर्ता ट्रॅक्टर वरील चालक (नावगाव माहिती नाही) या आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.७५/२०२४ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७,२८३सह मोटार वाहन कायदा कलम-१०४/१७७ ,१३४,(अ)(ब)/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढील तपास शहर पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करत आहेत.