जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

समृद्धीवर अपघात दोन ठार,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  

   कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर आज सकाळी ०६ वाजेच्या सुमारास ह्युंदाई वेरना कारला (क्रं.एम.एच.०५ के.७००) अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत कार चालक सचिन सोपान पाटील हा स्वतः व त्याचा मित्र अल्पेश प्रदीप गुरव (वय-२७) हे दोघे जण ठार झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

 

समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्याने परिणाम स्वरूप या समृद्धी महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वहातूक वाढली आहे.गतिरोधक नसल्याने माल व प्रवासी वाहतूक चालक हे भरधाव वेगाने आपली वहाने चालवत असून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून यातील मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात आज सकाळी ०६ वाजेच्या सुमारास घडली असून त्यात दोन जण ठार झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात मुंबई-नागपूर हा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग दोन टप्प्यात पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण गत वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींनी मोठ्या डामडोलात पूर्ण केले असून पुढील शेवटचा टप्पा अद्याप अपूर्ण आहे.मात्र पूर्ण झालेल्या रस्त्यावर वेगाचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहन चालक सुसाट सुटत आहे.त्यातच या महामार्गावर अद्याप झाडे,विविध सूचना फलक अन्यत्र दिसत नसल्याने अनेक चालकांना सुस्ती आल्याची उदाहरणे आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.कमी टोल व जेवढा प्रवास तेवढाच टोल असल्याने या मार्गावरून जाण्यास वाहनचालक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहे.परिणाम स्वरूप या समृद्धी महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वहातूक वाढली आहे.गतिरोधक नसल्याने माल व प्रवासी वाहतूक चालक हे भरधाव वेगाने आपली वहाने चालवत असून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून यातील मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात आज सकाळी ०६ वाजेच्या सुमारास हुंडाई वैरना या कारला (क्रं.एम.एच.०५ के.७००) अज्ञात वाहनाने आज रात्री ०८ वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली आहे.त्या अपघातात कार चालक सचिन सोपान पाटील (वय-२९) रा.कोळसेवाडी कल्याण हा स्वतः व त्याचा मित्र अल्पेश प्रदीप गुरव (वय-२७) रा.कोळसेवाडी कल्याण जि.ठाणे हे दोघे जागीच जण ठार झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.त्यातील दोन्ही मृताना ताब्यात घेतले असल्याचे वृत्त पोलीस सूत्रांनी दिले आहे.

   दरम्यान या प्रकरणी विजय लोटन पाटील (वय-३२) रा.जे.पी.कॉलनी गायकवाड वाडा अंबरनाथ ईस्ट पूर्व अंबरनाथ ता.कल्याण जि.ठाणे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी वरील अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा दाखल  केला आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी,पोलीस हे.कॉ.संतोष लांडे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३१/२०२४ भा.द.वि.कलम ३०४(अ) २७९,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
  
   या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.लांडे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close