जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

मोटार अपघात,एक ठार,एक जखमी,गुन्हा दाखल 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवरील हिंगणी पुलावर टाटा मांझा (क्रं.एम.एच.२१व्ही.४५७५) या कारने एका हिरो-होंडा या दुचाकीला क्रं.एम.एच.१७ जे.६३३) हिस धडक दिल्याने दुचाकीवरील दोन इसम नदी पात्रातील पाण्यात पडल्याने या अपघातात दुचाकीवरील शांताराम बाबुराव आहेर (वय-५०) रा.धारणगाव इसमाच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तो पाण्यात बुडल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला आहे.तर दुसरा इसम बाबासाहेब यशवंत रणशूर (वय-५७) रा.मुर्शतपुर या गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार चालक याचे विरुद्घ गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान या घटनेने धारणगावसह हिंगणी शिवारात खळबळ उडाली असून नागरिकांनी या पुलावर कठडे बांधण्याची मागणी केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी काठी असलेल्या हिंगणी वाड्याच्या जवळ दक्षिण बाजूस कोल्हापुर पद्धतीचा बंधारा राज्य शासनाने बांधला असून त्यावरून नजीकचे ग्रामस्थ ये-जा करत असतात.मात्र वर्तमानस्थितीत त्या बंधाऱ्यावरील पुलावर कठडे नसल्याने अनेक अपघातांना आमंत्रण ठरत आहे.अशीच घटना नुकतीच घडली आहे.त्यामुळे सदर कठडे शासनाने त्वरित बांधावे अशी मागणी ग्रामस्थानीं केली आहे.

श्रीमंत राघोबा दादा हे राजकारणातून निवृत्त होऊन जेंव्हा कोपरगावात आले तेव्हा त्यांनी कोपरगावच्या पश्चिमेस साधारण सात कि.मी.अंतरावर असलेल्या दक्षिण वाहिनी असलेल्या गोदावरी नदी काठी हिंगणी येथे प्रशस्त वाडा बांधला होता.मात्र त्याच्या तीन भिंती पूर्ण होत आल्या असताना राघोबा दादा यांचे  दि.११ डिसेंबर १७८३ रोजी निधन झाले होते.त्या वेळी त्यांनी आपला अंत्यविधी या वाड्यात व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.त्यानुसार त्यांचा अंत्यविधी त्याच ठिकाणी केला गेला होता.त्यांच्या निधनानंतर आनंदीबाई या नाशिक येथे निघून गेल्याने या वाड्याला कोणी वाली राहिला नाही.आज त्याच वाड्याच्या जवळ दक्षिण बाजूस कोल्हापुर पद्धतीचा बंधारा राज्य शासनाने बांधला असून त्यावरून नजीकचे ग्रामस्थ ये-जा करत असतात.मात्र वर्तमानस्थितीत त्या बंधाऱ्यावरील पुलावर कठडे नसल्याने अनेक अपघातांना आमंत्रण ठरत आहे.अशीच घटना नुकतीच घडली आहे.त्यात हिंगणी पुलावर टाटा मांझा (क्रं.एम.एच.२१व्ही.४५७५) या कारने एका हिरो-होंडा या दुचाकीला क्रं.एम.एच.१७ जे.६३३) हिस धडक दिल्याने दुचाकीवरील दोन इसम नदी पात्रातील पाण्यात पडल्याने या अपघातात दुचाकीवरील शांताराम बाबुराव आहेर (वय-५०) रा.धारणगाव इसमाच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तो पाण्यात बुडल्याने तो जागीच मयत झाला आहे.तर दुसरा इसम बाबासाहेब यशवंत रणशूर (वय-५७) रा.मुर्शतपुर या गंभीर जखमी झाला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले,पोलीस उपनिरीक्षक भाटेवाल आदींनी भेट दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांत कार चालक याचे विरुध्द गुन्हा क्रं.४८७/२०२३ अन्वये भा.द.वि.कलम ३०४(अ) २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले याचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close