साहित्य व संस्कृती
शिर्डीत…या समाजाची राज्यस्तरीय संवाद यात्रा संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डीत आदिवासी ठाकूर समाजाच्या वतीने नुकतीच साई पालखी या ठिकाणी संघटना विरहित,’राज्यस्तरीय संवाद यात्रा’ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

आदिवासी ठाकर समाज आजही उपेक्षित जीवन जगत असून या समाजाला संघटित व त्यांच्यात जनजागृती करण्याचे काम या समाजातील उच्च शिक्षित कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे.या बाबत नुकतीच शिर्डीत येथे या समाजाची,’जनसंवाद यात्रा’ आयोजित केली होती त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”हे ठाकर हे मूळचे मुंगी पैठणचे समजले जातात.निजामाच्या जाचामुळे ते बालाघाट,कोकण,जुंदारखोरा,महालदेश आदी ठिकाणी डोंगर दऱ्याखोऱ्यात लपले.तीन पिढ्यापासून पैठण सोडले.तेथून ते कोकणातील टाकेदला गेले.तेथून ते नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात गेले.निजामाच्या सैनिकांशी दोन हात करतांना बायका आपले लुगडे आडवे खोचून गुंडाळत व त्या युद्धास सज्ज होत असत.पळापळीत जो वेश घेतला तो अद्यापही तसाच असल्याचे मानले जात आहे.त्यांना आता संघटित करण्याचे काम काही तरुणांनी सुरू केले असून त्यातून शिर्डीत ही राज्यस्तरीय जनसंवाद यात्रा नुकतीच संपन्न झाली आहे.
सदर प्रसंगी वासुदेव ठाकूर,भाऊसाहेब पंढरीनाथ ठाकूर,दिनेशकुमार रोहिदास साळुंके,डॉ.मनोहर देवरे,महेश रामराव पवार,दिलीप जगताप,मिलिंद ठाकर,भगवान ठाकूर,ज्ञानेश्वर ठाकूर,सुलभा पवार,अशोक सिसोदिया,हिरालाल पवार,भाऊसाहेब ठाकूर,तुकाराम ठाकूर,दिनेश ठाकूर,जगन्नाथ चव्हाण,भगवान संकपाळ,किशोर कदम,अरुण रामचंद्र ठाकूर,संतोष संकपाळ,नारायण ठाकूर,महेश चव्हाण,नरेंद्र साळुंके,दिपक चव्हाण,सुदाम ठाकूर,तुकाराम भोसले,मनमोहन ठाकूर,स्वाती ठाकूर,ऍड. अभिजीत पवार,विनायक इंगळे,रामेश्वर चव्हाण,तन्मय सोनवणे,बाबासाहेब इंगळे,दत्तात्रय जगताप,विजय इंगळे,कमलाकर चव्हाण,सुजाता कमलाकर चव्हाण,अनिल पवार,योगिता साळुंके,संध्या पवार,सपना सोनवणे आदींसह बहू संख्येने नागरिक उपस्थित होते.
सदर प्रसंगी समाजातील तरुणांचे वाढते वय चिंतेचा विषय ठरला असून यावर विचार मंथन करण्यात आले आहे.त्यावेळी प्रास्तविक व संवाद यात्रेचा उद्देश चंद्रकांत सोनवणे यांनी स्पष्ट केला आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन ए.पी.ठाकूर,रणजीत शिंदे यांनी केले आहे.
सदर प्रसंगी पुढील संवाद यात्रा खानदेश विभागामध्ये लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
प्रारंभी उपस्थित जमात बांधवांच्या शुभहस्ते आदिवासीचे जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून संवाद यात्रेची सुरूवात करण्यात आली होती.उपस्थितांचे आभार नगर येथील जिल्हा महिती अधिकारी रवींद्र ठाकूर यांनी मानले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश पवार,लीलाधर ठाकूर,दत्तात्रय जाधव,प्रकाश भामरे,रामेश्वर ठाकूर,जनार्दन ठाकूर,योगेश ठाकूर,विजय शालिकराम ठाकूर,विजय ठाकूर,योगेश ठाकूर आदींनी प्रयत्न केले आहे.