जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

मयत सभासदाच्या वारसास नुकसान भरपाई

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील सभासद साहेबराव देवराम औताडे यांचे दुचाकी अपघातात अपघाती निधन झाले होते.त्यांच्या वारसांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते दोन लाख पंचवीस हजाराचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला आहे.

कर्मवीर काळे कारखाना प्रशासनाकडून न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीकडे मयत सभासदाच्या अपघात संदर्भातील सर्व कागदपत्र सादर केले होते.न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीने सर्व कागदपत्रांची खातरजमा करून मयत सभासदाच्या वारसाला २ लाख २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती.ती त्यांच्या वारस अजिंक्य औताडे यांस प्रदान करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकर राव काळे सहकारी कारखान्याने कारखाना व्यवस्थापणाने कारखान्याच्या सभासदांचा न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीकडून सभासदांची विमा मंजूर करून घेतलाआहे.कारखान्याच्या सभासदांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटंबाला आर्थिक मदत व्हावी या उद्देशातून सर्व सभासदांची विमा पॉलिसी काढण्यात आली आहे.कारखान्याचे पोहेगाव येथील सभासद अड्.साहेबराव देवराम औताडे यांचे अपघाती निधन झाले होते.

कर्मवीर काळे कारखाना प्रशासनाकडून न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीकडे मयत सभासदाच्या अपघात संदर्भातील सर्व कागदपत्र सादर केले होते.न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीने सर्व कागदपत्रांची खातरजमा करून मयत सभासदाच्या वारसाला २ लाख २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती.या नुकसान भरपाईच्या रक्कमेचा धनादेश नुकताच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.काळे यांच्या हस्ते मयत सभासद स्व.साहेबराव देवराम औताडे यांचे वारस त्यांचा मुलगा अजिंक्य औताडे यांना देण्यात आला.सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक अनिल कदम,प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,सचिव बी.बी.सय्यद,सहाय्यक सचिव एस.डी.शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close