जाहिरात-9423439946
सहकार

…या संस्थेची दिनदर्शिका प्रेरणादायी-डॉ.महानुभाव

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

‘समता पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात सभासदांचा विश्वास संपादन केला असून या संस्थेचे कर्मचारी सभासदांना आदरपूर्वक सेवा देत असतात.समताने सहकार क्षेत्रात एक प्रतिष्ठा निर्माण केली आहे समताचा हा उपक्रमदेखील आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून आम्हा सर्वांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुक्यातील महानुभाव संप्रदायाचे आचार्य डॉ.यशराज महानुभाव यांनी कोपरगाव शहरात एका कार्यक्रमात बोलताना नुकतेच केले आहे.

”समताच्या ठेवी ७३० कोटी रुपयांवर पोहोचल्या असून, कर्ज वाटप ५५८ कोटी इतके आहे. त्यात २२५ कोटी रुपयांचे सोनेतारण कर्ज असून, संस्थेची गुंतवणूक १९० कोटी इतकी आहे.संस्थेच्या ९९.६१ टक्के ठेवीदारांच्या ठेवी समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंड स्कीमनुसार अतिशय सुरक्षित आहेत. समता ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंगद्वारे तत्पर सेवा पुरविण्यात महाराष्ट्रात अग्रेसर आहे”-ज्येष्ठ संचालक अरविंद पटेल,समता नागरी सहकारी पतसंस्था कोपरगाव.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व. मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात गुरुवारी कोपरगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ.नरेंद्र भट्टड,बबलू वाणी,कान्हेगाव येथील संस्थेचे ज्येष्ठ ठेवीदार किसन सांगळे,संस्थेचे ज्येष्ठ संचालक अरविंद पटेल,चांगदेव शिरोडे, संदीप कोयटे,गुलशन होडे यांच्या उपस्थितीत समता दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन झाले.डॉ. महानुभाव यांचा सत्कार संस्थेचे ज्येष्ठ संचालक अरविंद पटेल यांच्या हस्ते,डॉ.नरेंद्र भट्टड यांचा सत्कार संदीप कोयटे यांच्या हस्ते,बबलू वाणी यांचा सत्कार चांगदेव शिरोडे यांच्या हस्ते,तर ठेवीदार किसन सांगळे यांचा सत्कार गुलशन होडे यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक संदीप कोयटे यांनी केले.त्यावेळी ते म्हणाले की,’समता दरवर्षी सभासदांसाठी समता दिनदर्शिकेची छपाई करून कोपरगाव शहरातील सभासद,सरकारी कार्यालये आणि हितचिंतकांपर्यंत घरपोच देत असते. सभासदही समता दिनदर्शिकेची आतुरतेने वाट पाहत असतात.

डॉ.नरेंद्र भट्टड म्हणाले की,”समताचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली समता पतसंस्थेने सर्व सभासदांचा विश्वास संपादन केला आहे.समताच्या सर्वच सभासदांच्या ठेवींना सुरक्षितता प्रदान करण्याचे काम समता पतसंस्था करत आहे.सदर प्रसंगी संस्थेचे ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी सूत्रसंचालन केले असून उपस्थितांचे आभार महाव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close