जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

कोपरगाव तालुक्यातील…या सोसायटीचा १५ टक्के लाभांश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील माजी आ.दादासाहेब रोहमारे विविध कार्यकारी सेवा संस्थेची सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष सचिन रोहमारे यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

माजी आ.रोहमारे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या संपलेल्या वित्तीय वर्षात १७ लाख २१ हजार ९२२ रुपयांचा नफा झाल्याचे अध्यक्ष सचिन रोहमारे यांनी सांगितले आहे.त्यामुळे सभासदांना दिवाळी लाभांश १५ टक्के तर संस्थेच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस जाहीर केला आहे.त्या बद्दल सभासद व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदर प्रसंगी संस्थेच्या माजी अध्यक्षा शकुंतलाबाई रामराव रोहमारे,संस्थेचे माजी उपाध्यक्ष डॉ.जगदीश झंवर,भाऊसाहेब रोहमारे,वसंत रोहमारे,जयंत रोहमारे,रमेश रोहमारे,दीपक रोहमारे,संजय वसंत रोहमारे,अशोक रोहमारे,सतीश रोहमारे,नवनाथ जाधव,गोरख जाधव,शिवाजी जगताप,ललिता रोहमारे,अलका रोहमारे,योसेफ भालेराव,भाऊसाहेब सोनवणे, तुकाराम जाधव,नंदू रोहमारे,विजय रोहमारे,बाळासाहेब रोहमारे,सुभाष जाधव,बाळासाहेब औताडे,पोपट शेळके,विलास रोहमारे,द्वारकानाथ होन,तुषार रोहमारे,अजय रोहमारे,रवींद्र रोहमारे आदींसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिव रवींद्र गुजर यांनी केले त्यात त्यांनी विषय पात्रिकेचे वाचन केले आहे.सदर प्रसंगी अध्यक्ष सचिन रोहमारे यांनी आपल्या संस्थेचा लेखाजोखा मांडला आहे.त्यात त्यांनी संस्थेला संपलेल्या वित्तीय वर्षात १७ लाख २१ हजार ९२२ रुपयांचा नफा झाल्याचे सांगितले आहे.त्यामुळे सभासदांना दिवाळी लाभांश १५ टक्के तर संस्थेच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस जाहीर केला आहे.त्या बद्दल सभासद व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

त्यावेळी गावातील उद्योजक जनार्दन वाके यांना उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे. उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष डॉ.जगदीश झंवर यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close