जाहिरात-9423439946
सहकार

…सिनगर यांचे कार्य कौतुकास्पद-माजी मंत्री घोलप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या कार्याचा आलेख हा अन्य संस्थांना मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बबन घोलप यांनी भोजडे येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी सोसायटीच्या माध्यमातून कै.सिताराम व्यंकटराव सिनगर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रत्येक वर्षी एक आदर्श सभासद म्हणून पुरस्कार देण्यात येत असतो.हे पुरस्काराचे दहावे वर्ष असून यावर्षीचा आदर्श सभासद पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शंकर भवानी सिनगर यांना देण्यात आला.

कोपरगाव तालुक्यातील मौजे भोजडे येथील भोजडे नं.२ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,भोजडे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आज सरला बेटाशी निगडित गवंडगाव येथील आश्रमाचे महंत गोपालगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोरील प्रांगणात मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

सदर प्रसंगी महंत गोपालगिरी महाराज,कोपरगाव सहकार विभागाचे सहाय्यक निंबंधक नामदेव ठोंबळ,तालुका विकास अधिकारी अविनाश काटे,सोसायटीचे उपाध्यक्ष दिनकर बाबासाहेब सिनगर तर संचालक रावसाहेब सिनगर,ज्ञानेश्वर सिनगर,फकीरचंद जेऊघाले,दीपक धट,अशोक रखमाजी मंचरे,कुंडलिक रामचंद्र घुले,विजय दामोदर सिनगर,बळीराम व्यंकट सिनगर,राजेंद्र घणघाव,भीमजी शिंदे,सचिव जालिंदर टेके,मदतनीस मधुकर सिनगर यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी,सभासद व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचेक,सन्मानचिन्ह व रोख रक्कम १ हजार १११ रुपये देण्यात आले. तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सोसायट्यांचे अध्यक्ष यांचाही यावेळी ‘सहकार सन्मान’ करण्यात आला असून प्रत्येकास “मराठी आठव दिवस” ही पुस्तिका भेट देण्यात आली.असा कार्यक्रम कोपरगाव तालुक्यात पहिल्यांदाच पार पडला आहे.

यावेळी शिवाजी ठाकरे,आबासाहेब भोकरे,अशोक काजळे,शहाराम सिनगर,अशोक कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे.सूत्रसंचलन राम गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शंकर सिनगर यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close