जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

कोपरगाव तालुक्यातील… या सहकारी पतसंस्थेला बँको पुरस्कार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी भरीव योगदान देत नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागातील कुंभारी येथील राघवेश्वर पतसंस्थेला अविज पब्लिकेशनद्वारा आयोजित बँको अॅडव्हान‍‌टेज सहकार परिषदेने सहकार क्षेत्रातील नामवंत असलेला बँको पुरस्काराने लगुना रिसॉर्ट लोणावळा येथे सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या पूर्वी राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन कडून दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार सलग तीन वेळेस मिळवत पुरस्काराची हॅट्रीक केली आहे.

पुणे येथील कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष जेष्ठ विधीज्ञ प्रल्हाद कोकरे,भारतीय रिझर्व्ह बँकेचे निवृत्त जेष्ठ अधिकारी अविनाश जोशी,जेष्ठ अधिकारी शांताराम भालेराव, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर,कल्याण जनता सहकारी बँकेचे संचालक अशोक नाईक,बँको चे संचालक अविनाश शिंत्रे आदि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेचे मानद सचिव सतीश निलकंठ यांना प्रदान करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी देणाऱ्या विविध नामवंत पतसंस्थांपैकी राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था असून या संस्थेमध्ये ग्राहकाभिमुख विविध सेवांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,कोअर बँकिंग प्रणाली,क्यु.आर कोड सिस्टीम,एन.ई.एफ.टी., आर.टी.जी.एस.,मोबाईल कलेक्शन,एस.एम.एस.सुविधा प्रिंटींग पास बुक,सीबील रिपोर्ट,ऑनलाइन भरणा,सोने तारण कर्ज या सुविधा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागात नावलौकिक प्राप्त असून ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तत्पर सेवा संस्थेतील उच्च विद्याविभूषित कर्मचारी वृंद देत असतात. त्यामुळे राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला बँको पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. बँको पुरस्काराची निवड विविध निकष, परीक्षणातून केली जाते, त्यात बँकेचे कामकाज आणि अहवालाची कसून तपासणी करतात. या निवड समितीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी व बँकिंग क्षेत्रातील तज्ञ मान्यवर परीक्षक म्हणुन काम पाहत असतात.
राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला बँको पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे सर्वश्री गोपीनाथ निलकंठ,अशोक वारुळे,सोपान चिने,बाबासाहेब देवकर, श्रीराम घुले,संजय चंदनशिव,सागर निलकंठ,शंकर बढे, अरुण कदम रावसाहेब थोरात आदि संचालकांसह संस्थेचे सभासद आणि ग्राहकांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close