सहकार
भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे दुग्ध क्रांती-भविष्यवाणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका दुध संघ,भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकूळ मिशन प्रकल्पांतर्गत उरळी कांचन येथील बायफ संस्था याच्या संयुक्त सहकार्याने उच्च वंशावळीच्या देशी गायींच्या भ्रूण प्रत्यारोपण कार्यक्रम हाती घेतला असून या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे भविष्यात जातिवंत देशी गाईंचे संवर्धन होणार आहे. शिवाय या तंत्रज्ञानाच्या वापराने दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे प्रतिपादन गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले आहे.
भ्रूण प्रत्यारोपणासाठी पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन येथील बायफ संस्थेचे देशी भ्रूण प्रत्यारोपणावर काम करणारे तज्ञाचे पथक सर्व तयारी निशी आले होते.या पथकाने वारीतील एक व राहाता तालुक्यातील शिंगवे येथील २७ अशा एकूण २८ देशी गायींच्या गर्भाशयात कृत्रिम रेतानातून तयार करण्यात आलेले सात दिवसाचे देशी भ्रूण प्रत्यारोपण केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील दुध उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर आनंदराव टेके यांच्या गायींच्या गोठ्यावर तालुक्यातील पहिल्या भ्रूण प्रत्यारोपणास उपक्रमास गुरुवारी (दि.१०) सुरुवात करण्यात आली.या वेळी परजणे बोलत होते.
भ्रूण प्रत्यारोपणासाठी पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन येथील बायफ संस्थेचे देशी भ्रूण प्रत्यारोपणावर काम करणारे तज्ञाचे पथक सर्व तयारी निशी आले होते.या पथकाने वारीतील एक व राहाता तालुक्यातील शिंगवे येथील २७ अशा एकूण २८ देशी गायींच्या गर्भाशयात कृत्रिम रेतानातून तयार करण्यात आलेले सात दिवसाचे देशी भ्रूण प्रत्यारोपण केले.या पथकाचे प्रमुख डॉ.विठ्ठल घाडगे,सहायक डॉ.हेमंत कदम,कोपरगाव येथील बायफचे प्रमुख डॉ. बाळासाहेब जीगळेकर,डॉ.सचिन वाघमारे,सुधाकर बाबर,अकबर शेख,वारी येथील बायफ संकरीत गो- पैदास केंद्राचे प्रमुख डॉ.मनोज वाकोडे,बाळासाहेब कोल्हे,भाऊसाहेब जाधव,नवनाथ कवडे यांचा समावेश होता.
यावेळी डॉ.हेमंत कदम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भ्रूण प्रत्यारोपण याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी वारीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.शिवाजी बाचकर,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके,गोरख टेके,सुनील टेके,संजय टेके,वसंत टेके,फकीर टेके,अनुराग टेके,सतीश शिरसाठ यांच्यासह वारीतील दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.