जाहिरात-9423439946
सहकार

सभासद हितासाठी..या साखर कारखान्याची निवडणूक लढविणार-शेतकरी संघटना

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ऊसाचा रास्त भाव आणि सभासदांच्या व कामगारांच्या हितरक्षणासाठी शेतकरी संघटना अशोक कारखान्याच्या निवडणुकीत भाग घेऊन सत्ताधाऱ्यांना आव्हान देणार असल्याचा निर्धार नुकत्याच श्रीरामपूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्ह्यात २०२० मध्ये मुदत संपलेल्या ०१ हजार ९१६ संस्था असून त्यांची येत्या वर्षभरात सहा टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहेत.पहिल्या टप्प्यात १५६ स्थांच्या निवडणूकांचा समावेश आहे.या निर्णयानुसार, सहकारी साखर कारखाने,बाजार समित्या,सोसायट्या,पतसंस्था,दूध संघ,सहकारी बँकाच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्ह्यात २०२० मध्ये मुदत संपलेल्या ०१ हजार ९१६ संस्था असून त्यांची येत्या वर्षभरात सहा टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहेत.पहिल्या टप्प्यात १५६ स्थांच्या निवडणूकांचा समावेश आहे.या निर्णयानुसार, सहकारी साखर कारखाने,बाजार समित्या,सोसायट्या,पतसंस्था,दूध संघ,सहकारी बँकाच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.त्यात श्रीरामपुर तालुक्यातील सहकारी कारखानदारीत अग्रणी असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक संपन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने श्रीरामपूर येथे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन केले होते.त्यावेळी हा निर्णय जाहीर केला आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत अशोक कारखान्याने अनावश्यक खर्च करून चालवलेला मनमानी कारभार,प्रत्येक हंगामात वाढ होण्याऐवजी कमी-कमी होत असलेला ऊसाचा भाव,कारखान्या मार्फत इतर कारखान्याला बेकायदेशीर ऊस पुरवठा करून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान,अशोक बँकेने कार्यक्षेत्रा बाहेर केलेले कर्ज वाटपामुळे वसुलीसाठी बाहेर चा कोवळा उस प्रथम गाळप केला त्यामुळे कार्यक्षेत्रात मागे पडलेला ऊस तोडणी कार्यक्रम,यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत असुन,त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव मिळुन सोसावा लागत असल्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाच्या मनमानी कारभारा विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असुन,शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणुन सभासदाच्या आर्थिक हितासह कामगारांच्या सन्मानासाठी सत्ताधारी संचालक मंडळास राजकीय आव्हान उभे करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केले.सत्ताधारी मंडळाविरुद्ध एकास एक उमेदवार देण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न राहील यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अॅ्ड.अजित काळे,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब पठारे,जिल्हा संघटक युवराज जगताप,रूपेंद्र काले,नेवासा तालुका प्रमुख हरिभाऊ तुवर,श्रीरामपूर तालुका प्रमुख अनिल औताडे,युवा आघाडी चे तालुकाध्यक्ष शरद आसने,बबनराव उघडे,बाळासाहेब कदम,डॉ.शंकरराव मुठे,सतिष आसने,सुदामराव आसने,मनोहर मतकर,कैलासराव पवार,बाळासाहेब आसने आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील बेलापूर,पढेगाव,टाकळीभान,गोंडेगाव,उंदिरगाव,वडाळामहादेव,माळवाडगाव,पाचेगाव,पुणतगाव परिसरातील अनेक युवक कार्यकर्ते आवर्जुन उपस्थित होते.अशी माहिती अनिल औताडे यांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close