जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या साखर कारखान्याचा उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खाती वर्ग

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १५० प्र.मे.टन ऊस दराचा दुसरा हप्ता व यापूर्वी जाहीर केलेले ठिबक सिंचनचे अनुदान ठिबक सिंचनने ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना १०० प्र.मे.टन अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेवून सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दिली आहे.

“यावर्षी गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीत १२१ दिवस चाललेल्या  गळीत हंगामात ६ लाख ५८ हजार ५०० मे.टन ऊसाचे गाळप करून ७ लाख ३४ हजार ४५० क्विंटल साखर पोती उत्पादन घेवून चालू गळीत हंगाम पूर्ण केला आहे;-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

  

   यावर्षी गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीत १२१ दिवस चाललेल्या  गळीत हंगामात ६ लाख ५८ हजार ५०० मे.टन ऊसाचे गाळप करून ७ लाख ३४ हजार ४५० क्विंटल साखर पोती उत्पादन घेवून चालू गळीत हंगाम पूर्ण केला आहे.गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केलेला आहे त्यांना पहिली उचल प्र.मे.टन रुपये २ हजार ८०० याप्रमाणे यापूर्वीच अदा करण्यात आलेली आहे.तर द्वितीय हप्ता रक्कम रुपये १५० प्र.मे. टन देण्याचा व ठिबक सिंचन अनुदान १०० प्र.मे. टन देण्याचा निर्णय नुकताच संचालक मंडळाने घेतला असून जवळपास १०.६४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती आ.काळे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close