जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
समाजकल्याण विभाग

“सामाजिक न्याय पर्व”उपक्रमातून महिनाभर विविध योजनांची जनजागृती

न्यूजसेवा

अ.नगर,-(प्रतिनिधी)

एप्रिल महिन्यात राष्ट्र पुरुष,थोर व्यक्ती यांची जयंती असुन १ मे रोजी महाराष्ट्र दिवस आहे.महापुरुषांनी समाजकार्याचा घालुन दिलेला वारसा डोळयासमोर ठेऊन समाजकल्याण विभागाने राष्ट्र पुरुष,थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत १ एपिल ते १ मे २०२३ या महिनाभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ देण्यासाठी “सामाजिक न्याय पर्व” हा अभिनव उपक्रम समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत असुन या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमध्ये नुकताच करण्यात आला आहे.

“सामाजिक न्याय पर्वातून”जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे,संविधान जनजागृती कार्यक्रम तसेच प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती निर्माण करणे,नवउद्योजकांसाठी उद्योजकता शिबिर आयोजित करणे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन करणे,दिव्यांग बांधवांना व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्तांनी दिले आहेत.

सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने १ एपिल ते १ मे २०२३ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यात प्रत्येक जिल्ह्यात संबधित जिल्ह्याचे पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सामाजिक न्याय पर्वाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे,दि.१ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहीमेचे आयोजन करणे,राज्यातील सहायक आयुक्त,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय यांच्यावतीने शिक्षण विभागाशी समन्वय साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत जात प्रमाणपत्र देणे,सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे,महाविद्यालय,आश्रम शाळा,निवासी शाळा व शासकीय वसतीगृहांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर इतरही महापुरुषांच्या विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,पथनाट्य स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करणे.

तालुका व जिल्हास्तरावर विविध योजनेचे लाभार्थी यांना प्रातिनिधिक स्तरावर साहित्य वाटप करणे व योजनांची माहिती देणे, समतादुत यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागात जनतेला सामाजिक योजनांची माहिती देणे व सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणे,अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करणे,आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती व नागरिकांचे मेळावे घेणे.

ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे,संविधान जनजागृती कार्यक्रम तसेच प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती निर्माण करणे,नवउद्योजकांसाठी उद्योजकता शिबिर आयोजित करणे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन करणे,दिव्यांग बांधवांना व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्तांनी दिले आहेत.त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करताना स्थानिक निवडणुका व आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचनाही देण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close