जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

कोपरगावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे निमित्ताने कोपरगाव तहसील कार्यालयाचे प्रांगणात आज सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण तहसीलदार विजय बोरुडे यांच्या शुभहस्ते व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.तर नगरपरिषदेत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या तर कोपरगाव पंचायत समितीत गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.


सदर प्रसंगी माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनीचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप  वर्पे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,सामाजिक वणीकरनाचे लागवड अधिकारी निलेश रोडे,वनीकरण अधिकारी प्रतिभा सोनवणे ,तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव,शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे,रवींद्र पाठक,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन शिंदे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,विनायक गायकवाड,साळुंके,वैभव गिरमे,संजय जगताप,फकीर कुरेशी,मेहमूद सय्यद,
आदी मान्यवर उपस्थित होते.

   या निमित्त कोपरगाव तहसील,कोपरगाव पंचायत समिती,कोपरंगाव नगरपरिषद आदी इमारती तिरंग्या विद्युत रोषणाईने सजविण्यात आल्या होत्या.कोपरगाव तहसील कार्यालयातील वरिष्ठ सभागृहात तालुका कृषी विभागाच्या वतीने दिवसभर शंभर रानभाज्यांचे प्रदर्शन पाककृती आयोजित करण्यात आले होते.
   सदर प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांना मानवंदना दिली आहे.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,माजी आ.कोल्हे,तहसीलदार विजय बोरुडे आदींनी मनोगत व्यक्त केले व तालुकातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.


    दरम्यान समता शिक्षण संस्थेच्या वतीने राज्य पतसंस्था व लायन्स क्लब,समता शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली १ हजार १११ फूट लांबीच्या विक्रमी तिरंग्याची ‘समता फेरी’ काढण्यात आली होती.त्यात आ.आशुतोष काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,टेकचंद खुबाणी,आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते,शिक्षक विद्यार्थी,आदी उपस्थित होते.

  
कोपरगाव तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या महत्वपूर्ण ध्वजारोहण कार्यक्रमात कोपरगाव शहर पोलिसांकडून तहसीलदार विजय बोरुडे मानवंदना स्वीकारताना दिसत आहे.

  सदर प्रसंगी वीरमाता सरलाताई अमोल जाधव,स्वातीताई विजय चौरे,कांबळे ताई,अंकिता ताई भोसले,मंगलाताई वलटे,आदींचा गौरव केला आहे.कोरोना साथीच्या काळात माजी सैनिक यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला आहे.त्यात नितीन कुहिले,दत्तात्रय पगार,विकास मुळेकर,शिवाजी निकम,देविदास गवांदे,युवराज गांगवे,आदींसह अनेक तालुक्यातील माजी सैनिकांचा समावेश होते. 

    सदर प्रसंगी लायन्स क्लब व समता पतसंस्थेच्या वतीने लांबीच्या ध्वजाचे अनावरण व फेरीचे आयोजन समता संकुला पासून सुरू करण्यात येऊन त्याची दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वाजत गाजत सांगता करण्यात आली.त्यावेळी पदाधिकारी शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close