जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न होणार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंगळवार दि.१२ जुलै ते गुरुवार दि.१४ जुलै या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले आहे.

श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या,गुरु-शिष्य परंपरा फार प्राचीन आहे.आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. श्री साईबाबांच्या हयातीतही गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे.त्यामुळे या दिवसाला आजही अनन्य साधारण महत्व आहे.श्री साईबाबांवर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येवून समाधीचे दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात.याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी मंगळवार दिनांक १२ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती,०५.४५ वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक,०६.०० वाजता व्दारकामाई श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण,०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन,सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत ह.भ.प.स्‍नेहल संतोष पित्रे,डोंबवली (ठाणे) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.सायं. ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल.रात्रौ ०७.३० ते ०९.५० यावेळेत श्री.अनंत पांचाळ,मुंबई यांचा भक्‍ती गीतांचा कार्यक्रम,रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक होणार असून पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.या दिवशी पारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहील.

उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी बुधवार दिनांक १३ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती,०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक,०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत ह.भ.प.सौ.स्‍नेहल संतोष पित्रे, डोंबवली (ठाणे) यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल.रात्रौ ०७.३० ते ०९.५० यावेळेत श्री.अविनाश गांगुर्डे, नाशिक यांचा भक्‍ती गीतांचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रींची शेजारती व दिनांक १४ जुलै रोजीची पहाटेचे श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्रौ १० ते पहाटे ०५ वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.

उत्सवाच्या सांगता दिनी गुरुवार दिनांक १४ जुलै रोजी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन,सकाळी ०७ वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १० वाजता ह.भ.प.स्‍नेहल संतोष पित्रे, डोंबवली (ठाणे) यांचा गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० चे दरम्‍यान श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.१५ यावेळेत श्री.वैष्‍णवीस, संगीत व नृत्‍य संस्‍था, तेलंगणा यांचा नृत्‍य नाटक कार्यक्रम होईल. रात्रौ १० वाजता श्रींची शेजारती होईल.

उत्सवाच्या निमित्ताने व्दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्री साईसच्चरिताच्या अखंड पारायणासाठी जे साई भक्त इच्छुक आहेत त्यांनी आपली नावे दिनांक ११ जुलै २०२२ रोजी दुपारी ०१ ते सायंकाळी ०६ यावेळेत समाधी मंदिरासमोरील देणगी काऊंटर नंबर ०१ वर नोंदवावीत. सोडत पध्दतीने पारायणासाठी भक्तांची नावे त्‍याच दिवशी सायंकाळी ०६.१० वाजता चिठ्ठ्या काढून निश्चित करण्यात येतील.तसेच दिनांक १३ जुलै रोजी होणा-या कलाकारांच्‍या हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकारांनी आपली नावे अनाऊसमेंट कक्षामध्‍ये मंदिर कर्मचा-यांकडे आगाऊ नोंदवावीत, असे ही श्रीमती बानायत यांनी सांगितले.
यावर्षाचा हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,सर्व विश्वस्त,मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव,सर्व प्रशासकीय अधिकारी,सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close