जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

कोपरगावात शांतता समितीच्या बैठकीत झाला,’एक गाव,एक गणपतीचा’ बाबत निर्णय

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आगामी गंणेशोत्सव व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर प्रशासनाने नुकतीच शांतता समितीची बैठक आयोजित केली होती.त्या बैठकीत शासनाच्या आदेशानुसार एक गाव एक गणपती राबविण्याचा योजनेला उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.त्यामुळे या वर्षीही शहरात व तालुक्यात एक गाव,एक गणपती योजना राबविण्यास येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“आम्ही या बाबत बैठक घेवुन उपस्थित नागरिकांना वस्तुस्थिती समजावून दिली आहे.त्यांना महाराष्ट्र शासन,गृह विभाग यांच्या कडील सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ संदर्भात प्राप्त परीपत्रका नुसार योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आम्ही शहरात सर्वांना “एक गाव एक गाव गणपती” बसविणे बाबत विनंती केली असता समिती बैठकीतील सर्वांनी “एक गाव एक गणपती” (शहर) बसविणे बाबत मान्य केले आहे”-वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक कोपरगाव शहर पोलीस ठाणे.

आगामी काळात शुक्रवार दि.१० सप्टेंबर पासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे तर या खेरीज गुरुवार दि.०७ ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे.मात्र दोन वर्षांपासून जगभर कोरोना विषाणूच्या साथीने कहर उडवून दिला आहे.अद्याप तो संपण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.त्यामुळे आगामी काळात हे उत्सव साजरे करणे जोखमीचे व नागरिक,भाविक भक्त यांच्यावर संकट निर्माण करणारे ठरणार आहे.याची प्रशासनाला जाणीव आहे.शिवाय दुसरी कोरोनाची लाट अद्याप संपलेली नाही.त्यामुळे प्रशासन धास्तावलेले आहे.वर्तमानात तर कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडील पोहेगाव जिल्हा परिषद गटात कोरोनाने थैमान मांडलेले आहे.या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव साजरे करणे जोखमीचे ठरणार आहे.त्यामुळे याबाबत राज्य शासनाने आदेश काढून या बाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन व शांतता समितीची बैठक घेऊन एक गाव एक गणपती हि योजना राबविण्यास प्रोत्साहन देण्यास सुचवले आहे.

कोपरगाव शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या मोठी असते.गावांमध्ये त्यामुळे कधीकधी वाद उद्भवतात.या पार्श्वभूमीवर एक गाव एक गणपती ही संकल्पना शहर पोलिस दरवर्षी राबवितात.या पार्श्वभूमीवर हि बैठक नवीन पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित केली होती.त्यात सर्वसंमतीने काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव तहसीलदार योगेश चंद्रे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,महावितरण कंपनीचे अधिकारी यांचेसह नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे उपस्थितीत कोपरगाव शहर पोलीस हद्दीतील शांतता समिती सदस्य,प्रतिष्ठित नागरिक,गणेश मंडळाचे अध्यक्ष,सदस्य व मंडप व्यावसायिक आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले की,”आम्ही या बाबत बैठक घेवुन उपस्थित नागरिकांना वस्तुस्थिती समजावून दिली आहे.त्यांना महाराष्ट्र शासन,गृह विभाग यांच्या कडील सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ संदर्भात प्राप्त परीपत्रका नुसार योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वांना शहरात “एक गाव एक गाव गणपती” बसविणे बाबत विनंती केली असता समिती बैठकीतील सर्वांनी “एक गाव एक गणपती” (शहर) बसविणे बाबत मान्य केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक यांनी शेवटी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close