जाहिरात-9423439946
सण-उत्सव

वृक्षारोपण करून ना.कडू यांचा वाढदिवस साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

वाकडी (प्रतिनिधी)
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष,जलसंपदा, शालेय शिक्षण,महिला व बालविकास इतर मागासवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती,या खात्याचे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त राहाता तालुक्यातील वाकडी गावात वृक्षरोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

प्रहार जनशक्तीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले यांच्या मार्गदर्शननुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.ना बच्चू कडू यांचा ५१वा वाढदिवस असल्याने वाकडी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ५१ वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी वाकडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ. संपतराव शेळके,कल्याणराव सदाफळ भाजपचे राहाता तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लहारे,उत्तर नगर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव शेळके, शिवसेना वाकडी शाखाप्रमुख महेश जाधव,खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील युवामंच वाकडी अध्यक्ष संदीपानंद लहारे,कामगार तलाठी बोधमवाड,प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर घेर्डे,बाबा शेळके,ग्रामपंचायत सदस्य जालिंदर कोते, सुनील कुरकुटे,वाकडीचे प्रगतशील शेतकरी व उद्योजक दत्तात्रय कोते,वाकडी गावचे पोलीस पाटील मच्छिंद्र अभंग,हरिभाऊ गोरे,अशोक कोते,सजय एलम,संजय पावसे,विजय गोरे,संतोष बोऱ्हाडे,प्रहार संघटना वाकडी शाखा उपाध्यक्ष सोमनाथ शेळके,प्रहार दिव्यांग शाखेचे उपाध्यक्ष लक्ष्मण सदाफळ,रवी कापसे,तात्या रसाळ आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close