सण-उत्सव
..या गावात शिवजयंती उत्साहात साजरी
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
इ.स.१८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला.शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स.१८७० साली शिवजयंती सुरू केली जी पहिली शिवजयंती होती.
इ.स.१८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला.शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स.१८७० साली शिवजयंती सुरू केली जी पहिली शिवजयंती होती. आणि शिव जयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.२०व्या शतकात,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली होती ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिव जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली आहे.या निमित्ताने लोहगाव येथेही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.याप्रसंगी राजेंद्र चेचरे किशोर तुरकणे दत्तात्रय चेचरे,शुभम चेचरे,रंजित इनामके,शिवाजी डांगे,विनायक भालेराव,विजय दरंदले,डॉ सुनील थोरात,पंकज भालेराव,दादासाहेब थोरात,तरुण मंडळाचे सर्व सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.