जाहिरात-9423439946
श्रीरामपूर तालुका

शेतकरी संघटनाच खरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कैवारी-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

श्रीरामपूर-(नानासाहेब जवरे)

श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक हि शेतकरी हितासाठी लढवली जात असून त्यात निवडणूक कारखान्याचे अध्यक्ष मुरकुटे यांनी वाह्यात विषयात भरकटुन देऊ नये असे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी मातापूर,पढेगाव आदी ठिकांनी बोलताना केले आहे.

“उसाचा व त्यापासून बनणाऱ्या उपपदार्थांमधून मोठी कमाई होत असताना त्याचा हिशेब कारखानदार देत नाही,उसाचे काटे मारतात.असे सांगून या सहकारी कारखांनदारीत शिरलेल्या अनिष्ठ प्रथांचा व गैरव्यवहारांचा पर्दाफाश केला आहे.ही शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना विजयी करा”-शिवाजीराव नांदकखिले,प्रदेशाध्यक्ष,क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिग्रेड.

श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामधेनू म्हणून महत्वपूर्ण असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवार दि.१६ जानेवारी रोजी संपन्न होत असून त्यासाठी सत्ताधारी मुरकुटे गटाच्या विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मोठे आव्हान निर्माण केले आहे.त्यामुळे प्रचार सभांना वेग आला आहे.त्यासाठी नुकतेच मातापूर येथे सायंकाळच्या सुमारास प्रचार बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच बापूसाहेब उंडे हे होते.

सदर प्रसंगी श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक,प्रदेश राष्ट्रवादी सरचिटणीस अविनाश आदिक,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,ज्ञानेश्वर मुरकुटे,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,श्री रामपूर नगरपरिषद अध्यक्षा अनुराधा आदिक,बाळासाहेब दोंड, रखमाजी कासार,पोपट लासुरे,तुकाराम दोंड,सदाशिव उंडे,बापूसाहेब उंडे,संजय आढाव,कैलास उंडे,सोपान उंडे,संजय उंडे,सुरेश बनकर,माधव उंडे,रामभाऊ उंडे,रमेश उंडे,पुंडलिक शिरोळे,उमेदवार वंदना मुरकुटे,अर्चना उंडे,अर्चना पानसरे,आदी मान्यवरांसह बहुसंख्य शेतकरी सभासद उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी हि निवडणूक लढवली आहे.यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट दूर करण्यासाठी हि निवडणूक लढवली जात आहे.निवडणूक घरगुती पातळीवर घसरू देऊ नये.हा विषय सार्वत्रिक करू नये असे आवाहन करून येथील ऊसतोड टोळ्या बाहेर का जात आहे.अशोक बँक बाहेर का काम करत आहे.दीड हजार टन बाहेरून का घेतला जात आहे.ऊस वेळेवर का घेऊन जात नाही.ऊस उतारा कमी का केला जातो.उपपदार्थांचा भाव का मिळत नाही.ऊस वेळेवर नेला पाहिजे हे साखर आयुक्त सांगतात.मग सत्ताधारी त्यावर का बोलत नाही.आज ०२ हजार ४०० शेचा भाव का दिला जात आहे.या पूर्वी का दिला गेला नाही.आमच्या वडिल स्व.बबनराव काळे यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी का अट्टहास केला होता.साखर कारखानदार तुमची लूट का व कशी करतात. त्यावर त्यांनी अभ्यास करून आंदोलने केली.शेतकऱ्यांसाठी स्वतःच्या अंगावर खटले का घेतले.हि व्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी अट्टाहास केला होता.तोच अट्टाहास आज आम्ही करत आहे.वंदनाताई मुरकुटे या महिला असूनही शाळा चालवू शकत असतील तर हे नवीन शेतकरी संघटनेचे संचालक चालवू शकणार नाही का? एकदा त्यांना संधी द्या तरच हा क्रांतिकारक बदल होऊ शकेल.त्या साठी एका मतांची मागणी करत आहे.या पूर्वी मुरकुटे यांना पस्तीस वर्ष संधी दिली पण त्यांनी काही बदल केला का ?असा सवाल करून बदल होणारच नसेल तर मग एकदा आम्हाला संधी द्या.असे आवाहन करून आगामी सोळा जानेवारी रोजी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना कपबशी चिन्हावर मत देऊन संधी द्या अशी विनंती सभासदांना केली आहे.व राज्यात एक सहकारी संघटनेच्या माध्यमातून एक मॉडेल तयार करू असे शेवटी आवाहन अड्.काळे केले आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक यांनी केले तर उपस्थितांना शिवाजीराव नांदखिले,यांनी उसाचा व त्यापासून बनणाऱ्या उपपदार्थांचा हिशेब देऊन या सहकारी कारखांनदारीत शिरलेल्या अनिष्ठ प्रथांचा व गैरव्यवहारांचा पर्दाफाश केला आहे.ही शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

शेतकरी संघटनेच्या उमेदवार वंदना मुरकुटे यांनी बोलताना,” मी ज्ञानेश्वर मुरकुटे (माऊलींची) यांची पत्नी आहे.आणि हुंडा देऊन आली आहे.हात धरून आली नाही.शाळा सुरू केली ती यशस्वी चालवली आहे.मी सून म्हणून कदाचित कमी पडले असेल पण तुम्ही मुरकुटे साहेब यांनी कुटुंबप्रमुख म्हणून समजावून का घेतले नाही ? असा कडवा सवाल केला आहे.

सदर प्रसंगी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी तुऱ्याची गोष्ट सांगून चांगलीच करमणूक केली तर सुरेश ताके यांनी अशोक कारखाना ४५० कोटींनी तुटीत आहे कारखाण्याची जिंदगी ६५० कोटींची आहे.असा गौप्यस्फोट केला आहे.

यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी जेष्ठ नेते मुरकुटे यांनी कौटुंबिक गोष्टीवर बोलण्याऐवजी ऊस दरावर, को-जनरेशनवर,उपपदार्थ उत्पादनावर त्याच्या भावावर बोलले पाहिजे,मी तुमचा मुलगा नाही शोधार्थ तुमचा नाही.तुम्ही आमची उपेक्षा केली.मात्र शिल्पा मुरकुटे कशी वागली हे सुद्धा तुम्ही बोलले पाहिजे ती आजही आपल्या पतीचे नाव लावण्याऐवजी भानुदास मुरकुटे यांचेच नाव लावते.यावर बोला.आमच्यावर बोलले हे चुकीचे आहे.जेष्ठ नेत्यांवर सुद्धा आपण घसरले आहे.कुकडीची निवडणूक बिनविरोध झाली तुम्हाला सुद्धा वाटले अशोकची ही निवडणूक बिनविरोध होईल मात्र हा डाव तुम्हाला का साधला नाही ? असा सवाल विचारून तुमची पायाखालची वाळू घसरली असल्याचा आरोप केला आहे.तुम्ही कोणालाही सोडले नाही.त्यामुळे बिनविरोध निवडणूक करता आली नाही ते तुमचे अपयश आहे.व आम्हाला पदरात घेऊन शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले आहे.

तर सदर प्रसंगी अविनाश आदिक,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,अड.सर्जेराव घोडे,यांनी मार्गदर्शन केले आहे.सूत्रसंचलन यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय उंडे यांनी मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close