शिर्डी लोकसभा मतदार संघ विकास कामे
पशुपालकांनी अनुदान योजनेचा लाभ घ्या-खा.वाकचौरे

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) ही एक केंद्र सरकारची योजना असून यातून पशुधन उत्पादकता वाढवणे आणि चांगल्या जातीचे पशुधन वापरून आणि योग्य व्यवस्थापनाद्वारे दुग्ध उत्पादन वाढवून पशुपालकांना आर्थिक मदत करणेसह या योजनेत पशुपालकांना अनुदान आणि इतर आर्थिक सहाय्य दिले जात असून या योजनेचा शिर्डी लोकसभा मतदार संघातील पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या योजनेचे दिल्लीतील उपायुक्त डॉ.अनिल बनगोहर यांनी नुकतेच शिर्डी येथे केले आहे.

सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे यांनी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे वतीने दिल्ली येथील राष्ट्रीय पशुधन अभियानाचे उपायुक्त डॉ.अनिल बनगोहर यांचा शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला आहे.
राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) ही एक केंद्र सरकारची योजना आहे,जी पशुधन क्षेत्राच्या विकासासाठी आहे.या योजनेचा मुख्य उद्देश पशुधन उत्पादकता वाढवणे,तसेच पशुपालकांना आर्थिक मदत करणे आहे.या योजनेत कुक्कुटपालन,मेंढी,शेळी आणि डुक्करपालन यांसारख्या क्षेत्रांना प्रोत्साहन दिले जात आहे.या योजनेचे मुख्य उद्देश हा पशुधन उत्पादकता वाढवणे,चांगल्या जातीचे पशुधन वापरून आणि योग्य व्यवस्थापनाद्वारे उत्पादन वाढवणे,पशुपालकांना आर्थिक मदत करणे,या योजनेत पशुपालकांना अनुदान आणि इतर आर्थिक सहाय्य दिले जात आहे.या शिवाय पशुधन व्यवसायात नवीन उद्योजक तयार करणे आणि त्यांच्या व्यवसायांना मदत करणे असे आहे.या शिवाय पशुपालकांना आधुनिक पशुधन व्यवस्थापनाची माहिती देणे आणि त्यांना आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत करणे असे आहे.यातून चांगल्या चाऱ्याचे उत्पादन करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि जनावरांना रोगांपासून वाचवण्यासाठी उपाययोजना करणे व यातून पशुधन व्यवसायात नवीन उद्योजक तयार करणे असे आहे.या विभागात केंद्रीय पातळीवर सदस्य म्हणून केंद्र सरकारने शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची नियुक्ती केली असून त्यांनी शिर्डी मतदार संघातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होण्यासाठी दिल्ली येथील अधिकाऱ्यांच्या दौरा नुकताच आयोजित केला होता.त्या निमित्त शिर्डी येथील व्हि.आय.पी.अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

“गोपालन आणि कुक्कुट पालन व्यवसायासाठी किमान २५ ते कमाल ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे.शिवाय या योजनेतून शेतकऱ्यांना मका कुट्टी करण्यासाठी आवश्यक मशीन घेण्यासाठी अनुदान देण्याची व्यवस्था आहे.त्यातून शेतकरी सदर मूरघास पॅकिंग करून विक्री करू शकतात.व त्यातून मोठी आर्थिक कमाई करू शकतात.यात तरुणांना देशी कोंबड्या,वराह पालन करता येऊ शकते”-खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.
सदर प्रसंगी राष्ट्रीय पशुधन अभियानाचे उपायुक्त डॉ.अनिल बनगोहर,सहाय्यक आयुक्त श्री गुप्ता,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,चिंचोली गुरव येथील महेंद्र सोनवणे,कृती समितीचे ज्ञानेश्वर वर्पे,कार्याध्यक्ष उत्तमराव घोरपडे,विलास गुळवे, आदीसह बहुसंख्येने शेतकरी उपलब्ध होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”गोपालन आणि कुक्कुट पालन व्यवसायासाठी किमान २५ ते कमाल ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे.शिवाय या योजनेतून शेतकऱ्यांना मका कुट्टी करण्यासाठी आवश्यक मशीन घेण्यासाठी अनुदान देण्याची व्यवस्था आहे.त्यातून शेतकरी सदर मूरघास पॅकिंग करून विक्री करू शकतात.व त्यातून मोठी आर्थिक कमाई करू शकतात.यात तरुणांना देशी कोंबड्या,वराह पालन करता येऊ शकते.सरकार यात शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदान देत आहे.ज्या शेतकऱ्यांना आपली स्वतःची जमीन नाही त्यांनी जमीन मालकांची समंती आवश्यक असल्याचे सांगितले आहे.मात्र त्यासाठी सदर शेतकऱ्यांना सिबिल स्कोर आवश्यक असून त्यातून त्याला हा फायदा होऊ शकतो असे जाहीर केले आहे.सदर शेतकऱ्याला आपला प्रस्ताव ऑनलाईन करता येऊ शकतो.सदर प्रस्ताव सरकार तपासून त्यास मंजुरी देणार आहे.यात किमान २५ ते कमाल ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.याचा शिर्डी लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक नानासाहेब जवरे यांनी केले असून त्यांनी खा.भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदार संघात राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली आहे.त्यावेळी त्यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय पशुधन अभियानाचे उपायुक्त डॉ.अनिल बनगोहर यांचा शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला आहे.तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वर्पे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार महेंद्र सोनवणे यांनी मानले आहे.